Malnutrition Agrowon
ताज्या बातम्या

Malnutrition : ठाणे जिल्ह्यात कुपोषणाची छाया गडद

कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी बाळंतविडा, पोषण चळवळ, गर्भवतींसाठी डोहाळे जेवण आदी विविध योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. पण ग्रामीण भागातील कुपोषणाचे प्रमाण वाढत असल्याचे जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

Team Agrowon

Thane Malnutrition News ठाणे : जिल्ह्यातील कुपोषणाचे (Malnutrition) प्रमाण कमी करण्यासाठी बाळंतविडा, पोषण चळवळ, गर्भवतींसाठी डोहाळे जेवण आदी विविध योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत.

पण ग्रामीण भागातील कुपोषणाचे (Malnutrition In Rural) प्रमाण वाढत असल्याचे जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मागील वर्षी एप्रिल २०२१- मार्च २०२२ मध्ये तीव्र कुपोषित बालकांची संख्या १२२ इतकी नोंदविण्‍यात आली होती.

एप्रिल ते डिसेंबर २०२२ या कालावधीत तीव्र कुपोषित बालकांची संख्या १४८ वर पोहोचली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २६ ने वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा आदिवासीबहुल म्‍हणून ओळखला जातो. या ठिकाणी वास्तव्यास असलेला प्रत्येक नागरिक मजूर काम करीत आहे. त्यामुळे येथील नागरिक हा मजुरीच्या कामासाठी स्थलांतरित होत असतो.

मजुरीच्या कामासाठी स्थलांतरित होत असल्यामुळे त्यांच्या बालकांकडे त्यांचे दुर्लक्ष होते. आहारातील उष्मांक आणि प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये कमी वजनाची बालके जन्माला येत असतात.

त्यामुळे गर्भवतीपणात त्या महिलांना पोषक असा आहार मिळणेदेखील गरजेचे असते. मात्र, त्या मातांनादेखील पुरेसा पोषण आहार मिळत नाही. त्यामुळे अनेकदा कमी वजनाची बालके जन्माला येतात.

बालक जन्मानंतर पहिले तीन महिने पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्यामुळे या कालावधीत मातेचे आरोग्य व पोषण चांगले राहणे आवश्यक आहे. मात्र, त्या काळात मातेला पोषक व पुरेसा आहार न भेटल्यामुळे त्याचा परिणाम बालकावर होऊन ते बालक कुपोषणाच्या विळख्यात अडकले जाते.

हा विळखा सोडविण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने विविध योजना राबविण्यास सुरुवात केली. गर्भवती मातांसाठी डोहाळे जेवण, पोषण चळवळ, संकल्प कुपोषण मुक्तीचा, भोंदू बाबांची कार्यशाळा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम आहार आदी योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, या योजना राबवूनदेखील कुपोषणाचे प्रमाण रोखण्यात अपेक्षित यश येत नसल्याचे दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gram Panchayat Reservation: ग्रा. पं. सदस्यांच्या आरक्षण सोडतीला लागला मुहूर्त

Nilesh Lanke Demands: पेट्रोल व्हॅट, सरचार्ज रद्द करून जनतेला दिलासा द्या : लंके

Solapur Gram Panchayat Reservation: सोलापुरातील ७०१ ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत १२ जूनला

Satara Gram Panchayat Reservation: साताऱ्यातील ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

Cotton Farming: अमरावती विभागात अतिसघन कापसावर भर

SCROLL FOR NEXT