Palghar Malnutrition : पालघरला कुपोषणाचा विळखा

पालघर जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
Malnutrition
Malnutrition Agrowon
Published on
Updated on

वसई : एकीकडे देश ७४ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करत असताना सावर्डे येथे दोन बालकांच्‍या झालेल्‍या मृत्‍यूने जिल्ह्यातील कुपोषणाचा (Palghar Malnutrition) प्रश्न पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आला आहे.

आरोग्य विभागाच्या (Health Department) आकडेवारीवरून डिसेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यात दोन हजार ४२७ कुपोषित बालकांची (Kuposhan) नोंद झाली आहे.

बालमृत्यूंमध्ये किंचित घट झाली असली तरी रोजगारासाठीच्‍या स्थलांतरणामुळे कुपोषणाचा कायम असलेला विळखा चिंताजनक बाब ठरत आहे.

पालघर जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यात ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’चा जनजागरदेखील प्रशासनाकडून करण्यात आला.

अशातच सावर्डे येथे दोन बालकांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाल्यानंतर कुपोषणाच्या प्रश्नाने पुन्हा डोके वर काढले आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यात दोन हजार ४२७ कुपोषित बालकांची नोंद झाली आहे.

बाल मृत्यूचे प्रमाण पाहता २०२१ या वर्षभरात २९६ इतके बालमृत्यू झाले होते, तर २०२२ या वर्षात बालमृत्यूच्या प्रमाणात किंचित घट होऊन हा आकडा २९४ इतका नोंद झाला आहे.

तसेच आरोग्य विभागाकडून आहार योजना, आरोग्य सुविधा तपासणी केली जाते. गरोदर मातांची, बालकांची आरोग्य तपासणी, वजन तपासणे, पौष्टिक आहार, कच्चे कडधान्य यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात.

पण रोजगाराचे साधन न मिळाल्याने अनेक कुटुंबीय स्थलांतर करतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत या उपाययोजना पोहचत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न कायम असल्याचे आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

Malnutrition
Malnutrition : मेळघाटातील कुपोषण निर्मूलन महत्त्वाचे

जनजागृतीची गरज

पालघर जिल्ह्यातील कुपोषणाची आकडेवारी पाहता, पाच वर्षांपूर्वी एकूण चार हजार कुपोषित बालकांची नोंद होत होती; पण आरोग्य विभागाच्या उपाययोजनेमुळे कुपोषित बालकांच्या संख्येत काही प्रमाणात घट होत आहे.

पण अजूनही हा आकडा दोन हजारांच्या पुढे आहे. त्यामुळे कुपोषणाचा प्रश्न कायम असल्याचे चित्र आहे. मुलांचे, गर्भवतींचे वजन, आरोग्याबाबत कोणती काळजी घ्यावी.

यासह विविध माध्यमातून जिल्हा प्रशासन जनजागृती करत असली, तरी हे प्रभावीपणे राबवून अधिकाधिक जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. जेणेकरून जिल्ह्यात कुपोषणमुक्त होण्यास मदत होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com