Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Potato Farming : पावसाने सातगाव पठार परिसरातील बटाट्याला जीवदान

Pune Rain Update : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात गुरुवारी (ता.८) दुपारपासून भीज पावसाला सुरुवात झाली.

Team Agrowon

Pune News : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात गुरुवारी (ता.८) दुपारपासून भीज पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी (ता.९) पहाटे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सातगाव पठार भागातील पाच हजार एकर क्षेत्रातील बटाटा व दोन हजार एकर क्षेत्रातील अन्य पिकांना जीवदान मिळाले आहे.

बटाट्याचे आगर म्हणून राज्यात खरीप हंगामात बटाटा उत्पादनात सातगाव पठार परिसर प्रसिद्ध आहे. गेले अनेक दिवस पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. गेले आठवडाभर पाऊस सतत हुलकावणी देत होता. गुरुवारी (ता.८) दुपारपासून भीज पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला पावसाचा जोर नव्हता. पण संध्याकाळी सहानंतर पावसाचा जोर वाढला.

विशेषता सातगाव पठार भागातील कुरवंडी, भावडी, थुगाव, कोल्हारवाडी, कारेगाव, पेठ, पारगावतर्फे खेड परिसरात समाधानकारक पाऊस सुरू झाल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. बटाट्याप्रमाणेच जवळपास दोन हजार एकर क्षेत्रातील सोयाबीन, वटाणा, कोबी, फ्लावर, फारशी, तरकारी, भाजीपाला व आदी पिकांना पावसामुळे आधार मिळाला आहे. भावडी गावाजवळ वेळ नदीवर असलेला बंधारा पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे.

सातगाव पठार भागात २ जुलै ते १२ जुलै दरम्यान बटाटा लागवडीची कामे जवळपास पूर्ण झाली होती. एकरी ७० ते ७५ हजार रुपये खर्च बटाटा उत्पादकांनी केला आहे. बटाटा पिकाची गेल्या दहा दिवसांपासून जोमदार वाढ सुरू असतानाच पाऊस लांबणीवर गेल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली होती. गुरुवारी (ता.८) पाऊस सुरू झाल्याने बटाटा पिकावरील धोका टळला आहे.
- अशोक बाजारे, बटाटा उत्पादक शेतकरी, भावडी, ता. आंबेगाव
पावसाने बटाटा पीक वाचले आहे. पण लष्करी आळी व उशिरा येणारा करपा, काजळी हा धोका अद्याप टळलेला नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञाचा सल्ला घेऊन वेळोवेळी बटाटा पिकाची फवारणी करणे गरजेचे आहे.
- भाऊसाहेब नाथा सावंत पाटील, बटाटा उत्पादक शेतकरी, पारगावतर्फे खेड, ता.आंबेगाव
सातगाव पठार परिसरात खरीप हंगामात बटाटा लागवड औषध खते मशागत यासाठी एकरी ७० ते ७५ हजार रुपये खर्च येतो. पाच हजार एकर क्षेत्रात बटाटा लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. त्यासाठी जवळपास ३५ कोटी रुपयांची गुंतवणूक बँका, विविध कार्यकारी सोसायटी यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या कर्जातून करण्यात आली आहे. पाऊस समाधानकारक झाल्याने सध्या तरी बटाटा उत्पादक शेतकरी चिंतामुक्त झाले आहेत. हे पीक पूर्णपणे पावसावरच अवलंबून आहे. कारण या भागामध्ये अद्याप कलमोडी धरणाचे पाणी मिळालेले नाही. कलमोडीचे पाणी या भागाला मिळावे म्हणून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना लवकरच या भागातील शिष्टमंडळ भेटणार आहे.
- राम तोडकर, बटाटा उत्पादक शेतकरी, पेठ, ता. आंबेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Compensation: कृषिमंत्री भरणे पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर; नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची दिली ग्वाही

Marathwada Rain: तीन जिल्ह्यांतील १९८ मंडलांत पावसाची हजेरी

Nanded Heavy Rain: मुखेडला पाच नागरिकांसह ५२ जनांवरांचा मृत्यू

Agriculture Technology: विदर्भातील दुर्गम भागात कृषी तंत्रज्ञान विस्तारासाठी प्रयत्न

Agriculture Technology: भात रोप निर्मितीचे नवे तंत्र ठरतेय फायद्याचे...

SCROLL FOR NEXT