Sharad King Pomegranate  Agrowon
ताज्या बातम्या

Sharad King Pomegranate : छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्याने विकसित केलेल्या ‘शरदकिंग’ डाळिंब वाणाला स्वामित्व हक्क

Pomegranate Variety : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाने त्यासंबंधीचे नोंदणी प्रमाणपत्र नुकतेच भोसले यांना दिले आहे.

सुदर्शन सुतार

Solapur News : जडगाव (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथील प्रगतिशील शेतकरी विठ्ठल भोसले यांनी निवड पद्धतीने विकसित केलेल्या ‘शरदकिंग’ या डाळिंबाच्या वाणाला राष्ट्रीय पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा कलम २००१ अंतर्गत स्वामित्व हक्क मिळाला आहे.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाने त्यासंबंधीचे नोंदणी प्रमाणपत्र नुकतेच भोसले यांना दिले आहे. डाळिंबाच्या वाणामध्ये पहिल्यांदाच एका शेतकऱ्याला असा मालकी हक्क मिळाला असावा.

श्री. भोसले गेली २५ वर्षे शेतीत आहेत, जडगावमध्ये त्यांची १८ एकर शेती आहे. त्यात नऊ एकर डाळिंब आहे. त्यात चार एकर भगवा डाळिंब आहे, तर उर्वरित पाच एकरवर त्यांनी स्वतः शोधलेल्या आणि विकसित केलेल्या शरदकिंग वाणाची लागवड आहे. अभ्यासू आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे.

सातत्याने नावीन्याचा ध्यास ते घेतात, त्यांच्या अभ्यास आणि निरीक्षण वृत्तीने २०१० मध्ये पहिल्यांदा त्यांना आपल्या बागेत काहीशी वेगळी वैशिष्ट्ये असलेले डाळिंबाचे झाड पाहायवास मिळाले. त्यानंतर त्या झाडापासून स्वतंत्र रोपे तयार करत ४०० रोपांपर्यंत वृद्धी व लागवड केली. त्यानंतर पुढे अभ्यास, निरीक्षण आणि अनुभवातून नवा वाण आकाराला आला.

‘शरदकिंग’ या नावाने त्याचे नामकरण केले. सन २०१४ मध्ये त्यांनी आपल्या वाणाच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय पीक वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाकडे प्रस्ताव दिला. तब्बल दहा-बारा वर्षाच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर आपल्या वाणाला स्वामित्व हक्क मिळवण्यात भोसले यशस्वी झाले. डाळिंब पिकात स्वामित्व हक्क मिळवणारे भोसले हे पहिलेच शेतकरी असावेत. त्यामुळे त्यांचे वेगळे कौतुक आहे.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राची मदत

डाळिंबाच्या नव्या वाणाच्या चाचणीसाठी देशभरातील एकमेव केंद्र म्हणून सोलापुरातील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राला ‘डीयूएस’ केंद्र म्हणून मान्यता आहे. सोलापुरातील डाळिंब संशोधन केंद्राचे केंद्र संचालक डॉ. राजीव मराठे आणि डीयूएस केंद्रातील शास्त्रज्ञांची टीम प्रामुख्याने डॉ. शिल्पा परशुराम, डॉ. पी. रूपा सौजन्य, डॉ. दिनेश बाबू, डॉ. ज्योत्सना शर्मा यांनी गेल्या काही वर्षांत स्वतः बागेला भेट देत आवश्यक त्या सर्व चाचण्या पूर्ण केल्या, वेळोवेळी आवश्यक ते मार्गदर्शनही केले आणि त्यासंबंधीचा अहवाल प्राधिकरणाला पाठवला. शास्त्रज्ञांच्या टीमने तांत्रिक आणि शास्त्रीय पद्धतीचे वेळोवेळी नियमित मार्गदर्शन केल्यानेच मोठी मदत झाली, असे भोसले यांनी आवर्जून सांगितले.

‘शरदकिंग’ची वैशिष्ट्ये

- पूर्णपणे गडद भगवा रंग आणि वजन. आकाराने मोठे फळ.

- साधारणपणे प्रति फळाचे वजन ३०० ते कमाल ८०० ग्रॅमपर्यंत मिळते.

- झाडांना फळांचे ‘सेटिंग’ चांगले राहते.

- साधारण ८० टक्के फळे एकाच आकाराची मिळतात.

- साल जाड असल्याने ‘सनबर्निंग’चा प्रादुर्भाव कमी राहतो.

विठ्ठल भोसले यांची निरीक्षणशक्ती आणि प्रयत्नांचे कौतुकच आहे. आम्ही त्यांना सर्वोतपरी मदत केली. वेळोवेळी आमच्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या प्लाॅटवर भेटी देत मार्गदर्शन केले, संशोधन केंद्राची टीम सातत्याने त्यांच्या संपर्कात होती. आज त्यांच्या वाणाला नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्याने आम्हाला खूपच आनंद झाला आहे.
-डॉ. राजीव मराठे, केंद्र संचालक, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर
डाळिंबाच्या फळात वजन आणि आकाराला महत्त्व आहे, बाजारपेठेची ती मागणी आहे. शरदकिंग वाणात ही सर्व गुणवैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. माझ्यासाठी हा आनंद खूपच अवर्णनीय आहे. आपल्या प्रयत्नांचे, कष्टांचे कुठे तरी चीज झाल्यासारखे वाटते.
-विठ्ठल भोसले, शेतकरी, जडगाव (ता. जि. छत्रपती संभाजीनगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT