Pomegranate Market : मालेगावच्या फळबाजारात डाळिंबाची आवक वाढली

Fruit Market : मालेगाव येथील फळबाजारात आंब्यापाठोपाठ डाळिंबाचीही आवक वाढली आहे. येथे रोज ६ हजार क्रेटची विक्री होत आहे.
Pomegranate
Pomegranate Agrowon
Published on
Updated on

Nashik News : मालेगाव येथील फळबाजारात आंब्यापाठोपाठ डाळिंबाचीही आवक वाढली आहे. येथे रोज ६ हजार क्रेटची विक्री होत आहे. घाऊक बाजारात ८० ते ११० रुपयापर्यंत डाळिंब विकला जात आहे. ८० टक्के माल परराज्यात विक्रीसाठी जात आहे.

शेतकरी डाळिंबाची विगतवारी करून चार प्रकार करतात. यात नंबर एक असलेल्या डाळिंबाला दर जास्त मिळतो.

Pomegranate
Pomegranate Orchard : खात्रीशीर रोपवाटिकांतून डाळिंब रोपांची खरेदी करा

कसमादे परिसरात मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे पीक घेतले जाते. रोगांचे आक्रमण झाल्याने अनेकांनी डाळिंब बागा उखडून फेकल्या. मात्र डाळिंब सारखा पैसा देणारे नगदी पीक नाही, याची शेतकऱ्यांना वारंवार खात्री झाली आहे. आता हळूहळू शेतकरी पुन्हा डाळिंबाची लागवड करू लागला आहे. डाळिंब हे सात महिन्यात येणारे पीक आहे.

Pomegranate
Pomegranate Farming : दुष्काळ सोसत केली डाळिंब शेती यशस्वी

ऑगस्टपासून ते जानेवारीपर्यंत फळबाजारात डाळिंबाची रेलचेल असते. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून येथे डाळिंबाची मोठी आवक वाढेल. तरीही भाव स्थिर राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.

शहरातून कानपूर, लखनऊ, पंजाब, हरियाना, पटणा, दिल्ली, भोपाळ, मुंबई यासह विविध राज्यांमध्ये व्यापारी डाळिंब विक्रीसाठी पाठवतात. शहरातील पूर्व भागातील बाजारात हलक्या स्वरूपाचा माल विकला जातो.

कसमादे परिसरातील डाळिंबाची गुणवत्ता असल्याने ग्राहक येथील डाळिंबाला पसंती देतात. दोन आठवड्यापूर्वी येथील बाजारात प्रथम दर्जाचा डाळिंब हंगामातील सर्वात उच्चांकी ३ हजार २०० ते ३ हजार ५०० दराने क्रेट विक्री झाला. सध्या ६ हजार कॅरेट डाळिंब विक्री होत आहे.

पंधरा दिवसानंतर डाळिंबाची आवक वाढेल. येथील बाजारपेठ विशेष डाळिंबसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात माल येथे येतो. फळ बाजारात सर्वात जास्त मागणी असून भाव चांगला आहे.
- विनायक जगताप, फ्रूट कंपनीचे मालक, मालेगाव
गेल्या वर्षापेक्षा यंदा भाव चांगला मिळत आहे. पंधरा दिवसांपासून सतत रिमझिम पाऊस व थंड वातावरणामुळे डाळिंबावर तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रिमझिम पावसात डाळिंब बागांवर फवारणी करता येत नाही. हातातोंडाशी आलेला घास या रोगामुळे हिरावला जात असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
- भारत सूर्यवंशी, डाळिंब उत्पादक, मुंगसे, ता. मालेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com