Pesticide Agrowon
ताज्या बातम्या

Pesticide Label : कीटकनाशकाचे लेबल आता हिंदी-इंग्रजी भाषेतच!

Latest Agriculture News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या या संदर्भातील पत्राला कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी उत्तर देताना हे स्पष्ट केले. शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान व कृषी विज्ञान आघाडीचे प्रमुख मिलिंद दामले यांनी या विषयाकडे गडकरी यांचे लक्ष्य वेधले होते.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : कीडनाशकांसोबत देण्यात येणाऱ्या माहितिपत्रकावर विविध भाषांमध्ये माहिती नोंदविलेली असते. परिणामी, अत्यावश्‍यक माहितीसाठी पॅकिंगवर पुरेशी जागा मिळावी यासाठी लेबलशी संबंधित माहिती हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषांमध्ये नोंदविण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्रालयस्तरावर घेण्यात आला आहे. अर्थात, ज्या भागात कीडनाशकाची विक्री करायची आहे, तेथील स्थानिक भाषेतच अत्यावश्‍यक माहिती देण्याची पूर्वीची तरतूद आहेच.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या या संदर्भातील पत्राला कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी उत्तर देताना हे स्पष्ट केले. शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान व कृषी विज्ञान आघाडीचे प्रमुख मिलिंद दामले यांनी या विषयाकडे गडकरी यांचे लक्ष्य वेधले होते. त्यानंतर गडकरी यांनी या प्रकरणात केंद्रीय कृषी मंत्रालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली होती. आता केंद्रीय कृषी मंत्रालयाने कीटकनाशक लेबल प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

उत्पादन पॅकिंगवर अत्यावश्‍यक माहितीसाठी पुरेशी जागा मिळण्यासाठी लेबलवरील माहिती देण्यासाठी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांची तरतूद करण्यात आली आहे. तथापि, ज्या राज्यात किंवा भागात उत्पादनाची विक्री करण्याचा उद्देश आहे तेथे शिफारशीत पिकांमध्ये कीडनाशकाची मात्रा, वापर, सुरक्षितता आदी अत्यावश्‍यक माहिती संबंधित प्रादेशिक भाषेतच देणे बंधनकारक आहे.

माहिती देण्यासाठीचा फॉन्ट आकार ८ किंवा २ मिमी असावा असे आधीच निर्देशित आहे. या तरतुदीची देखील प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल. केंद्रीय कृषी मंत्रालयाने केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणीकरण समिती (सीआयबीआरसी) सल्लामसलत करून त्याआधारे हा निर्णय घेतला असल्याचेही केंद्रीय मंत्रालयाने गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

ज्या राज्यात कीडनाशक उत्पादनाची विक्री होईल. त्याच स्थानिक भाषेत माहितिपत्रक असणार आहे. परिणामी, ते वाचनीय राहील. सोबतच पॅकिंगवर क्यू-आर कोड देण्याची तरतूद करण्यात आली आहे. हा कोड स्कॅन केल्यास कंपनीचे संकेतस्थळ उघडेल व त्या ठिकाणी उत्पादनाशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध होईल.
- मिलिंद दामले, प्रमुख, तंत्रज्ञान व कृषी विज्ञान आघाडी, शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT