Pesticide Label Claim : विषबाधांच्या पार्श्‍वभूमीवर कीटकनाशक लेबलींगमध्ये हवी सुधारणा

Pesticide : फवारणी दरम्यान कीटकनाशकांसोबत आलेला संपर्क आणि श्‍वसनाद्वारे २०१७ ते २०२१ या कालावधीत एकट्या यवतमाळ जिल्ह्यात ९७८ रुग्ण बाधित झाले.
Pesticide
Pesticide Agrowon
Published on
Updated on

Nagpur News : फवारणी दरम्यान कीटकनाशकांसोबत आलेला संपर्क आणि श्‍वसनाद्वारे २०१७ ते २०२१ या कालावधीत एकट्या यवतमाळ जिल्ह्यात ९७८ रुग्ण बाधित झाले. तर १३ जणांचा मृत्यू झाला.

त्याची दखल घेत श्‍वसनात्मक विषारीपणाच्या प्रमाणाचा स्पष्ट उल्लेख कीटकनाशकाच्या पॅकिंगवर असावा. त्याकरिता लेबलींगमध्ये सुधारणा व्हावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान आणि कृषी विस्तार आघाडीचे प्रमुख मिलिंद दामले यांनी रविवारी (ता. १७) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत हा मुद्दा उपस्थित करून या प्रकरणात हस्तक्षेपाची मागणी केली. निवेदनानुसार, यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २०१७ ते २०२१ या कालावधीत फवारणी दरम्यान विषबाधा झालेले ९७८ रुग्ण दाखल झाले.

Pesticide
Pesticide : ‘एमएआयडी’ची ३८.९१ लाख रुपयांची कीटकनाशके गायब

यामध्ये सर्वाधीक ४८४ रुग्ण २०१७ मध्ये दाखल झाले होते. यातील १३ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर विषबाधितांच्या मृत्यूची नोंद नाही. परंतू २०१७ मधील मृत्यूचे कारण श्‍वसनाद्वारे आणि संपर्क विषबाधा असे नमूद करण्यात आले आहे. परिणामी इनहेलेशन टॉक्‍सिसिटीचा उल्लेख करण्यासाठी पॅकिंग आणि लेबलिंगमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. त्याकरिता रंग, चिन्ह आणि सिग्नल शब्द, तसेच सावधगिरीच्या सुचनांमध्येही बदल होणे अपेक्षित आहे. यापूर्वी विषबाधांसाठी मौखिक आणि त्वचेच्या विषाच्या आधारीत वर्गीकरण करण्यात आले होते.

Pesticide
Pesticide Spraying : किडनाशक फवारणी करताना कोणती खबरदारी घ्याल?

त्यामुळे कायद्यात श्‍वसनाद्वारे होणाऱ्या विषबाधांचा अंतर्भावच होत नाही. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या ५ जून २०२० च्या राजपत्रानुसार लेबलवरील किमान फॉन्ट साईज निर्धारीत करण्यात आले आहे. परंतु त्याचीही अंमलबजावणी कीटकनाशक कंपन्यांकडून करण्यात आली नाही. पाण्याचा पीएच हा देखील कीटकनाशकाची परिणामकारकता साधण्यात महत्त्वाचा घटक ठरतो त्यामुळे तो किती असावा याची माहिती देखील पॅकिंगवर असणे गरजेचे आहे.

त्याकडे देखील कीटकनाशक कंपन्यांनी दुर्लक्ष चालविले आहे. पाण्याचा पीएच ५.५ ते ६.५ असला पाहिजे. लेबल क्‍लेम नोंदणी नसलेली कीटकनाशक एकत्रित केली जातात. त्यामुळे परिणाम तर मिळत नाही परंतु आरोग्यावर दुष्परिणाम होतात. हे प्रकार टाळण्यासाठी देखील कीटकनाशकाच्या पॅकेजींगवर स्पष्ट दिशानिर्देश असावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी शेतकरी संघटनेचे स्वप्निल नागपूरे, विजय निवल यांची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com