Rabi Jowar Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Jowar Pest : रब्बी ज्वारीवर ‘लष्करी’, तर हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव

विभागातील पाचही जिल्ह्यांतील रब्बी ज्वारीवर लष्करी अळीचा, तर हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

Team Agrowon

Rabi Crop Pest लातूर : विभागातील पाचही जिल्ह्यांतील रब्बी ज्वारीवर (Rabi Jowar) लष्करी अळीचा, तर हरभऱ्यावर घाटे अळीचा (Chana Pod Borer) प्रादुर्भाव आढळून आला आहे.

कृषी विभागाच्या (Agriculture Department) माध्यमातून शेतकऱ्यांना नियंत्रणासाठी उपाय सुचविले जात आहेत. गव्हाचे पीक ओंबी भरण्याच्या अवस्थेत असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर असून, १६ लाख ६९ हजार ९१२ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सरासरीच्या १२२ टक्के प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे.

विभागातील पीकनिहाय क्षेत्र व स्थिती

रब्बी ज्वारी- पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ७१ हजार ८५७ हेक्टर असून, आतापर्यंत २ लाख ९७ हजार ९०७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

त्याची टक्केवारी ८० टक्के आहे. पीक सध्या पोटरी ते कणसे लागण्याच्या अवस्थेत आहे. विभागातील सर्व जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याबाबत क्षेत्रीय स्तरावर उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

गहू- पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १लाख ५६ हजार ५१९ हेक्टर असून, आतापर्यंत १ लाख ५२ हजार २१६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ९७ टक्के आहे. पीक सध्या ओंबी भरण्याच्या अवस्थेत आहे.

हरभरा- पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ७लाख ८६ हजार १२४ हेक्टर असून, आतापर्यंत ११ लाख ५१ हजार ८५३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी १४७ टक्के आहे. पीक सध्या घाटे भरण्याच्या व पक्वतेच्या अवस्थेत आहे.

विभागातील सर्व जिल्ह्यांत घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. फवारणीबाबत क्षेत्रीय स्तरावरून इमामेक्टीन बेंझोएट ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच विभागातील सर्व जिल्ह्यांत काही ठिकाणी पिकावर अल्प प्रमाणात मर रोगाचा प्रादूर्भाव आढळून येत आहे.

रब्बी मका- पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १७ हजार ९७१ हेक्टर असून, आतापर्यंत १७ हजार ७६४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ९९ टक्के आहे. पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे.

करडई- पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १९ हजार ५३१ हेक्टर असून, आतापर्यंत २४ हजार ३३६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, त्याची टक्केवारी १२५ टक्के आहे. पीक सध्या बोंडे भरण्याच्या व काही ठिकाणी पक्वतेच्या अवस्थेत आहे.

कापसाची वेचणी अंतिम टप्प्यात

लातूर विभागात तुरीचे सरासरी क्षेत्र ३ लाख ४९ हजार २५३ हेक्टर असून, आतापर्यंत २ लाख ५६ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली असून, त्याची टक्केवारी ७३ आहे. पीक सध्या पक्वतेच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी काढणी सूरू असून, ७० ते ७५ टक्के काढणी पूर्ण झालेली आहे.

तसेच विभागात कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ८५ हजार ०८८ हेक्टर असून, ४ लाख २ हजार ०६८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली असून, त्याची टक्केवारी ८३ आहे. पिकाच्या वेचणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Second List: कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Agriculture Graduates Issues: कृषी पदवीधर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कृषिमंत्र्यांची भेट

Silk Farming: रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची संधी : डॉ. महेंद्र ढवळे

Shetkari Samruddhi Kisan Rail: ‘शेतकरी समृद्धी’ किसान रेल नावालाच!

Sugarcane Price Protest: ऊस दर जाहीर न करताच जॅगरी प्रकल्प सुरू, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT