Latur News : गेल्या काही दिवसापासून सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेल्या जिल्हा परिषदेच्या ५९ गटाचे आरक्षण सोमवारी(ता. १३) जाहीर झाले आहे. आरक्षण जाहीर झाल्याने आता राजकीय गणिते घालण्यास सुरवात झाली आहे. .आरक्षणानंतर काहींचा भ्रमनिरास झाला तर काहींच्या चेहऱ्यावर मात्र हास्य फुलले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आता कार्यकर्ते कामाला लागतील. पक्षश्रेष्ठींकडे आपल्यालाच कशी उमेदवारी मिळेल याकरिता मोर्चेबांधणीची तयारी आता कार्यकर्त्यांनी सुरु केली आहे..Maharashtra Election: निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ त्रयस्थाच्या हाती.आतापर्यंतच्या निवडणुकीत चक्राकार पद्धतीने आरक्षण काढले जात होते. पण या निवडणुकीपासून पहिल्यापासून आरक्षणाला सुरवात झाली आहे. त्यामुळे हे आरक्षण काढताना मागील आरक्षणाचा विचार करण्यात आला नाही. लातूर जिल्हा परिषदेच्या ५८ गट होते. पण आगामी निवडणुकीसाठी एक गट वाढला आहे. ५९ गट झाले आहेत..जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण गेल्या महिन्यात मुंबईत झाले होते. त्यानंतर ता. १३ आक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या ५९ गटासाठी आरक्षण जाहीर होणार होते. तर दहा पंचायती समितीच्या ११८ गणासाठीचे आरक्षण सोमवारी (ता. १३) त्या त्या पंचायत समित्यांमध्ये जाहीर करण्यात आले आहे. तर गटाचे आरक्षण जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले. .यावेळी अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी गणेश पवार यांची उपस्थिती होती. यात पहिल्यांदा लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीचे आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गाचे आरक्षण तीन लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून जाहीर करण्यात आले..Local Body Election: नव्यांना संधी; दिग्गजांची निराशा.विभागीय आयुक्तांकडे आक्षेप पाठविणारजिल्हा परिषद गटांच्या आरक्षणासंदर्भात कोणाला आक्षेप असतील तर त्यांनी लेखी स्वरूपात घ्यावेत, ते आक्षेप विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी गणेश पवार यांनी दिली..गटांचे प्रवर्गनिहाय आरक्षणसर्वसाधारण: हाडोळती, अंधोरी (ता. अहमदपूर), वांजरवाडा (ता. जळकोट), तोगरी (ता. उदगीर), जवळगा (ता. देवणी), नळेगाव (ता. चाकूर), एकुर्गा (ता. लातूर), खरोसा, उजनी, किल्लारी (ता. औसा), निटूर, अंबूलगा बु, दापका, हलगरा, कासारसिरसी (ता. निलंगा),सर्वसाधारण महिला: माळहिप्परगा (ता. जळकोट), वलांडी (ता. देवणी), खरोळा, कामखेडा, पोहरेगाव (ता. रेणापूर), आर्वी, हरंगूळ बु., काटगाव ( ता. लातूर), लोदगा, आशिव, मातोळा (ता. औसा), लांबोटा, औराद शहाजानी, मदनसुरी, सरवडी (ता. निलंगा)अनुसूचित जाती: शिरूर ताजबंद (ता. अहमदपूर), निडेबन, लोहारा, हेर (ता. उदगीर), साकोळ (ता. शिरुर अनंतपाळ), महाराणा प्रतापनगर (ता. लातूर)अनुसूचित जाती महिला: गुत्ती (ता. जळकोट), सोमनाथपूर, नळगीर (ता. उदगीर), येरोळ (ता. शिरुर अनंतपाळ), रोहिणा (ता. चाकूर), निवळी (ता. लातूर)अनुसूचित जमाती: सावरगाव रोकडा (ता. अहमदपूर)अनुसूचित जमाती महिला: तांबाळा (ता. निलंगा)नागरिकांचा मागास प्रवर्ग: वाढवणा (ता. उदगीर), बोरोळ (ता. देवणी), जानवळ, वडवळ (ता. चाकूर), पानगाव (ता. रेणापूर), भातांगळी, तांदूळजा (ता. लातूर ),नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला): खंडाळी, किनगाव (ता. अहमदपूर), चापोली (ता. चाकूर), पाखरसांगवी, मुरुड (ता. लातूर) लामजना, आलमला, भादा (ता. औसा)..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.