Pune News : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची ८८ वी बैठक बुधवारी (ता. १५) मंत्रालयात पार पडली. जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विदर्भ आणि तापी पाटबंधारे विकास महामंडळांच्या विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली..या बैठकीत वरखेडे-लोंढे मध्यम सिंचन प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच, अशाच प्रकारे इतर मंजूर सिंचन प्रकल्पांची कामेही गतीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश मंत्री गिरीश महाजन यांनी या बैठकीत दिले..Canal Irrigation : गिरणा ते मन्याड जोड कालव्याची शेतकऱ्यांकडून मागणी कायम.बैठकीदरम्यान, तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत जळगाव जिल्ह्यातील बोदवड सिंचन योजना, वाघूर प्रकल्प, वरखेडे-लोंढे मध्यम प्रकल्प, मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा-वडोदा प्रकल्प, एरंडोल तालुक्यातील अंजनी प्रकल्प तसेच गिरणा नदीवरील नव्या बंधाऱ्यांचा आढावा घेण्यात आला..तसेच, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत पेंच प्रकल्पातील कालव्यांची दुरुस्ती आणि अस्तरीकरण, निम्न वर्धा प्रकल्पांतर्गत वर्धा नदीवरील वरुड ते धनोडी रस्त्याचे काम, निम्न पैनगंगा प्रकल्पातील १३८ भूधारकांच्या अतिप्रदान रकमेची वसुली न करण्यासंबंधीचा निर्णय, सुरेवाडा उपसा सिंचन योजना, निम्न पेढी प्रकल्पातील पुनर्वसित गावांसाठी बांधकामाकरिता अनुदान, लखमापूर लघु पाटबंधारे प्रकल्प यासह विविध प्रस्ताव आणि प्रकल्पांच्या मान्यतेबाबत सविस्तर चर्चा झाली..Irrigation Wells: विहीर दुरुस्ती मंजुरीचे अधिकार बीडीओंना.मंत्री गिरीश महाजन म्हणाले, नियामक मंडळाच्या बैठकीत मंजूर झालेल्या कामांमुळे सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे. त्यामुळे ही कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी पुढे सांगितले की, प्रशासकीय मान्यता मिळालेल्या प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या..या बैठकीस आमदार मंगेश चव्हाण, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत बोरकर यांसह विविध क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.