Parbhani News : सुधारित आकडेवारीनुसार परभणी जिल्ह्यात सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यातील ८२४ गावांतील ४ लाख ७८ हजार ७४९ शेतकऱ्यांचे जिरायती, बागायती, फळपिके मिळून एकूण ३ लाख ४३ हजार ८८७ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. .त्यात २ हेक्टरपर्यंत ८२४ गावांतील ४ लाख ३९ हजार २९७ शेतकऱ्यांचे २ लाख ८५ हजार ८५३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, तर ३ हेक्टरपर्यंत ६९७ गावातील ३९ हजार ४५२ शेतकऱ्यांचे ५८ हजार ३३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. एकूण बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २९५ कोटी ७ लाख ३७ हजार ९४५ रुपये निधी अपेक्षित आहे..राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांना ३ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचा निर्णय जाहीर केला. पडताळणी दरम्यान काही तालुक्यातील खरिपाचे पेरणीक्षेत्र आणि बाधित क्षेत्र यांच्यात तफावत आढळून आल्यामुळे सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्र, बाधित शेतकरी, अपेक्षित मदत निधी यांची सुधारित आकडेवारी तयार करण्यात आल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले. .सप्टेंबर महिन्यात परभणी जिल्ह्यातील ५२ मंडलांत अनेक वेळा मुसळधार पाऊस झाला. ओढे, नाल्या, नद्यांचे पूर, गोदावरी नदीचा उसावा यामुळे जिरायती क्षेत्रातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका, बागायती क्षेत्रातील भाजीपाला, ऊस, हळद, कांदा, मिरची तर पपई, मोसंबी, आंबा, केळी, चिकू, संत्री आदी फळ पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले..Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे ८ हजार ७३९ हेक्टर जमिनीचे नुकसान.३ लाख ४१ हजार हेक्टर जिरायती पिकांना फटका...जिल्ह्यातील ८२४ गावांतील ४ लाख ७७ हजार ४३ शेतकऱ्यांचे ३ लाख ४१ हजार ८६५ हेक्टरवरील जिरायती पिकांचे नुकसान झाले असून, त्यात २ हेक्टरपर्यंत ४ लाख ३८ हजार ६३७ शेतकऱ्यांचे २ लाख ८३ हजार ९०३ हेक्टर तर ३ हेक्टरच्या मर्यादेत ६९७ गावातील ३९ हजार ४०६ शेतकऱ्यांचे ५७ हजार ९६२ हेक्टरवरचे नुकसान झाले. हेक्टरी ८५०० रुपये नुसार २९० कोटी ५८ लाख ५९ हजार ४५ रुपये निधीची गरज आहे..१११ हेक्टर बागायती पिके बाधित...परभणी, जिंतूर, सेलू, सोनपेठ, गंगाखेड,पूर्णा तालुक्यातील २० गावातील २४४ शेतकऱ्यांचे १११.२० हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाले असून, हेक्टरी १७ हजार रुपयेनुसार १८ लाख ९० हजार ४०० रुपये निधी अपेक्षित आहे..Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे भाजीपाला उत्पादक संकटात .१९१० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसानपरभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा तालुक्यातील ९७ गावांतील ३ हजार ३७ शेतकऱ्यांचे १ हजार ९१० हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले. हेक्टरी २२ हजार रुपयेनुसार ४ कोटी २९ लाख ८८ हजार ५०० रुपये निधीची गरज आहे, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.