Sugarcane Burnt Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Compensation : जळालेल्या उसाला एकरी ५० हजारांची भरपाई द्या

Sugarcane Burnt : दरवर्षी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर काही ना काही कारणांमुळे ऊस जळण्याच्या घटना घडतात.

Team Agrowon

Baramati News : दरवर्षी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर काही ना काही कारणांमुळे ऊस जळण्याच्या घटना घडतात. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. या जळालेल्या उसाची एकरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कष्टकरी शेतकरी समितीने केली आहे.

पाऊस न झाल्याने आणि खंडित वीजपुरवठ्यामुळे जळून गेलेल्या उसाचे त्वरित पंचनामे करून प्रतिएकरी ५० हजारांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कष्टकरी शेतकरी समितीने केली आहे. या संदर्भातील निवेदन बारामती, इंदापूरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे शेतकऱ्यांकडून देण्यात आले.

माळेगाव, सोमेश्वर आणि भवानीनगर या साखर कारखान्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. यावर्षी पाऊस न झाल्याने तसेच खंडित वीजपुरवठ्यामुळे ३० ते ३५ टक्के क्षेत्र पाण्याअभावी पूर्ण जळून गेले आहे. सोसायटी आणि बँकांचे कर्ज काढून शेतकऱ्यांवर फार मोठे संकट उभे राहिले आहे.

तरी संबंधित विभागामार्फत त्वरित पंचनामे करून एकरी ५० हजार रुपये जळालेल्या उसाची नुकसान भरपाई द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन नावडकर यांनी दिले. कष्टकरी शेतकरी संघटनेच्या अरविंद बनसोडे, दशरथ राऊत, विक्रम कोकरे, अमित जगताप, विजय देवकाते, पोपट निगडे आणि अजय देवकाते यांनी हे निवेदन दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cyclosinone Herbicide : केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो आणि जिओमार्टला नोटीस; अप्रमाणित तणनाशक विक्रीचं प्रकरण

Kharif Crop Prices: खरीप पिकांच्या भावात तेजी राहणार का?

Vidhan Parishad Election 2026: राज्यात पुन्हा निवडणुकीचा धुरळा, विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर

Solar Energy Project: अकोला परिमंडळातील ३३ हजार ३८० वीज ग्राहक बनले वीज निर्माते

School Education System: लाखो मुलांना शाळेबाहेर ढकलणारी व्यवस्था

SCROLL FOR NEXT