Crop Damage Agrown
ताज्या बातम्या

Paddy Crop Damage : पावसामुळे भातपीक आडवे

वाडा तालुक्यात मंगळवारी (ता. ११) सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळी पावसात कापणीस तयार होत असलेले उभे भातपीक आडवे झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

टीम ॲग्रोवन

वाडा, जि. पालघर : वाडा तालुक्यात मंगळवारी (ता. ११) सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस (Heavy Rainfall) झाला. या वादळी पावसात कापणीस तयार होत असलेले उभे भातपीक (Crop Harvesting) आडवे झाल्यामुळे मोठे नुकसान (Crop Damage) झाले आहे.

मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतात पाणी साचल्याने आडवे पडलेल्या भातपिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. भातपीक आडवे पडल्याने पाण्यात भाताचे दाणे व पेंढा काळे पडून खराब होण्याची भीती अधिक आहे.

तसेच आडवे पडलेले भातपीक कापणी करण्यास त्रासदायक व खर्चिक होणार आहे. यंदा पावसाचा मुक्काम वाढल्याने हातातोंडाशी आलेला घास निघून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. यावर्षी सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. याचा सरकारने गांभीर्यपूर्वक विचार करून ओळा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

शेती व्यवसायात मजुरांचा तुटवडा ही मुख्य समस्या असून हा व्यवसाय सरकारने रोजगार हमी योजनेंतर्गत आणायलाच हवा. तसेच शेतकऱ्यांना शेतीविषयक योग्य मार्गदर्शनासाठी तालुका स्तरावर शासकीय कृषी तज्ज्ञांच्या संख्येत अधिक वाढ करून अधिकाधिक कृषी शिबिरे आयोजित करावीत. जेणेकरून शेतकऱ्यांचे योग्य प्रबोधन होईल.

- श्रीकांत भोईर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, वाडा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT