Crop Insurance : ‘काढणीपश्चात नुकसान विमाभरपाई लाभासाठी दावे दाखल करा’

हिंगोली जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शूरन्स कंपनी लिमिटेड पुणे या कंपनीची निवड करण्यात आली आहे. खरीपातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडिद,ज्वारी या पिकांना विमा संरक्षण आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

हिंगोली ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत (Crop Insurance Scheme) स्थानिक नैसर्गिक आपत्ती ()Natural calamity, काढणीपश्चात नुकसान (Post Harvesting Crop Loss) या जोखिमेचा लाभ मिळावा यासाठी पीकविमाधारक (Crop Insurance) शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे विमा दावे (Insurance Claim) (पूर्वसूचना-इंटीमेशन) दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे.

Crop Damage
Crop Damage : ‘पिकं गेली माझी बुडी’

हिंगोली जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शूरन्स कंपनी लिमिटेड पुणे या कंपनीची निवड करण्यात आली आहे. खरीपातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडिद,ज्वारी या पिकांना विमा संरक्षण आहे. चालू खरीप-२०२२ हंगामात अतिवृष्टी, पूर इत्यादी कारणामुळे स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या जोखिमेसाठी विमा संरक्षण उपलब्ध आहे.

Crop Damage
Crop Damage : राज्यात पिकांवर ‘परती’चे पाणी

सद्यस्थितीत सोयाबीन पीक कापणीसाठी तयार असून काही ठिकाणी कापणी झालेले सोयाबीन शेतातच पडून आहे. सध्या चालू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अथवा काढणीपश्चात नुकसान या जोखिमेच्या लाभासाठी इंटिंमेशन (माहिती) दाखल करणे ही अट अनिवार्य आहे.

पावसाने नुकसान झालेल्या सर्व पीकविमाधारक शेतकऱ्यांनी दावे (इंटिमेशन) तत्काळ दाखल करावेत, असे आवाहन घोरपडे यांनी केले आहे.

अधिक माहीतीसाठी या नंबरवर संपर्क करा..

शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे इंटिमेशन (माहिती) देण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यात पीएमएफबीआय पोर्टल, कंपनीचा टोल फ्री क्र. १८००१०३७७१२, कंपनीचा ई-मेल आयडी : customerspportba@icicilombard.com , केंद्र शासनाचे क्रॉप इन्शूरन्स ॲप व ऑफलाईन पद्धतीद्वारे इंटिमेशन (माहिती) देता येते. इंटिमेशन (माहिती) देण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com