Water Storage
Water Storage  Agrowon
ताज्या बातम्या

Pach Patil : पाणीवाले ‘पाच पाटील’ पोहोचले संयुक्त राष्ट्रसंघात

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UNO) परिषदेत सहभागी होण्याचा मान महाराष्ट्राच्या ‘मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा’ चळवळीला मिळाला आहे.

मिशनचे प्रतिनिधी म्हणून ‘पाच पाटील’ (Pach patil) श्रीकांत पायगव्हाणे (Shrikant payghavane) परिषदेत सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे भारताच्या विनंतीनंतर प्रथमच जलपरिषद होते आहे.

जगात तिसरे महायुद्ध पाण्यामुळे होण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी जगभर आणि जलसंधारण करणे हे गरजेचे आहे. ‘जागतिक तापमानवाढ व हवामान बदल’ यासंदर्भात आतापर्यंत २६ वेळा जागतिक परिषदा झाल्या आहेत.

इजिप्तमधील २७ व्या परिषदेत तापमान वाढ, हवामान बदल यामध्ये जलक्षेत्राचा प्रामुख्याने सहभाग व्हावा, अशी आग्रही मागणी जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह राणा यांनी केली होती.

त्यामुळे बुधवारपासून (ता. २२) संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयाच्या सभागृहात तीन दिवसीय संयुक्त राष्ट्र जल परिषदेचे आयोजन केले आहे. परिषदेत सामील होण्याचा मान महाराष्ट्रातील चळवळीला मिळाला आहे.


१९३ देशांचे प्रतिनिधी यात सहभागी होतील. भारताचे प्रतिनिधी म्हणून जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे डॉ. सिंह यांच्यासह उपस्थिती लावणार आहेत. त्यानिमित्ताने न्यूजर्सीत दोन दिवसीय ‘जागतिक पाणी चर्चा’ हा एक वेगळा उपक्रमदेखील होत आहे.

राज्यात गाजलेल्या ‘मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा’ या चळवळीच्या प्रतिनिधींना त्यासाठी निमंत्रित केले गेले आहे. मिशनचे ‘पाच पाटील’ श्री. पायगव्हाणे परिषदस्थळी पोहोचले आहेत.

राष्ट्रसंघाच्या कार्यक्रमासोबत संलग्न उपक्रम म्हणून ब्रॉन्क्स कम्युनिटी कॉलेज तसेच कोलंबिया विद्यापीठातील चर्चासत्राला ते हजेरी लावणार आहेत.

‘मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा’ ही जल चळवळ चाळीसगाव तालुक्यात सुरू झाली. सनदी अधिकारी डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण यांनी २०१७ मध्ये धामणगावमध्ये चळवळीची पायाभरणी केली. लोकांनी, लोकांसाठी चालवलेली ही चळवळ समजली जाते. ‘डिझेल टाका व मशीन वापरा’ या तत्त्वावर चळवळ काम करते.

लोकांच्या सहभागातून ग्रामसभा होतात व सभेच्या नियोजनातून नाला खोलीकरण, रुंदीकरण, गावशिवारामध्ये बंधारे व तलाव तयार केले जातात.

त्यातून आतापर्यंत ९ जिल्ह्यांतील ७० गावांमध्ये ४५० कोटी लिटर जलसाठा तयार करण्यात आला. ३० किलोमीटर पाणंद रस्ते दुरुस्ती व ४५००० झाडे लावण्यात आली. या चळवळीचा देशभर गौरव झाला आहे.

असे तयार झाले पाण्याचे ‘पाच पाटील’
लोकांनी समूहाने, आपल्या गावामध्ये जलसाठे तयार करणे, त्याचे संवर्धन करणे, संगोपन करणे, भूजल पातळी वाढवणे हे जल व्यवस्थापात अपेक्षित असते.

भारतात ब्रिटिश येण्यापूर्वी गावागावांमध्ये पाण्याचे नियोजन गावकरी करत होते. नियोजन प्रमुखास ‘पाटील’ म्हटले जात होते.

त्यामुळे या संकल्पनेत पाच गावांची जबाबदारी घेणाऱ्या स्वयंसेवकाला या चळवळीत ‘पाच पाटील’ म्हटले जाते. राज्यात गेल्या सहा वर्षांपासून महाराष्ट्राच्या नऊ जिल्ह्यांमध्ये २१ ‘पाच पाटील’ कार्यरत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT