Jayant Patil : जयंत पाटील यांचे निलंबन

दिशा सालियान मृत्यूप्रकरणी विरोधकांना बोलू न दिल्याने संतापलेल्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्लज्जपणे बोलू देत नाही, असे म्हटल्याने त्यांचे अधिवेशन कालावधीसाठी निलंबन करण्यात आले.
jayant patil
jayant patilAgrowon

बाळासाहेब पाटील ः ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर : दिशा सालियान (Disha Saliyan) मृत्यूप्रकरणी विरोधकांना बोलू न दिल्याने संतापलेल्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narveskar) यांना निर्लज्जपणे बोलू देत नाही, असे म्हटल्याने त्यांचे अधिवेशन कालावधीसाठी निलंबन करण्यात आले.

jayant patil
Maharashtra Assembly Session : अडीच महिन्यांचा प्रशंसक दिसला विधान भवन परिसरात

दरम्यान अध्यक्ष विरोधकांना बोलू देत नाहीत. जयंत पाटील यांनी उच्चारलेला शब्द आक्षेपार्हच आहे. त्यासाठी पक्षाच्या वतीने आपण माफी मागतो. मात्र, विरोधकांना बोलूच द्यायचे नाही. एखाद्या विषयावर सहा सत्ताधारी आमदार बोलतात आणि विरोधकांच्या एकाही आमदाराला बोलू दिले जात नाही, हा पक्षपात आहे, असे सांगत अजित पवार यांनी विरोधक सभात्याग करत असल्याचे सांगितले.

जयंत पाटील यांनी संतापून अध्यक्षांना आक्षेपार्ह भाषा वापरल्यानंतर आक्रमक झालेल्या सत्ताधारी आमदारांनी तीन वेळा सभागृह बंद पाडले. पुरवणी मागण्यांवरील चर्चा पुकारली. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते बोलण्याची परवानगी मागत होते. मात्र, अध्यक्ष त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते.

jayant patil
Maharashtra Assembly Session : नागपूरच्या भूखंड वाटपप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

तब्बल अर्धा तास जयंत पाटील यांच्यासह अन्य आमदार हात वर करून परवानगीच्या प्रतीक्षेत होते. यावर संतापलेल्या जयंत पाटील यांनी ‘तुम्ही असा निर्लज्जपणा करून नका’ असे सुनावले. यावर सभागृहात उपस्थित असलेले मुख्यमंत्री प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी एकेरी भाषेत ‘याला निलंबित करा’ असे म्हणताच सर्व सत्ताधारी आमदार आमने सामने आले. त्यानंतर तीनेवळा सभागृह तब्बल पावणेदोन तास तहकूब केले.

सभागृह सुरू झाल्यानंतर उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटील यांना निलंबित करण्याची मागणी केली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पाटील यांना अधिवेशन कालावधीसाठी निलंबित करण्याचा आणि विधिमंडळ आवारात न येण्याचा ठराव मांडला. तो अध्यक्षांनी वाचून दाखविल्यानंतर मंजूर करण्यात आला. याचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com