Organic Farming  Agrowon
ताज्या बातम्या

Organic Farming : वर्णा येथे सेंद्रिय शेती प्रक्षेत्र पाहणी

Latest Agriculture News : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेतीअंतर्गत गुरुवारी (ता. १३) वर्णा (ता. जिंतूर) येथे सेंद्रिय शेती गटाची भेट व प्रक्षेत्र पाहणी आयोजित करण्यात आली होती.

Team Agrowon

Parbhani News : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेतीअंतर्गत गुरुवारी (ता. १३) वर्णा (ता. जिंतूर) येथे सेंद्रिय शेती गटाची भेट व प्रक्षेत्र पाहणी आयोजित करण्यात आली होती. राज्य समन्वयक (सेंद्रिय शेती प्रकल्पाचे राज्य समन्वयक सुनील चौधरी यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.

प्रकल्प संचालक आत्मा दौलत चव्हाण, उपप्रकल्प संचालक प्रभाकर बनसावडे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांच्या मार्गदर्शनात आयोजित या प्रक्षेत्र भेट कार्यक्रमात वर्णा, चांदज, नागापूर, रिडज, ताठापूर, दूधगाव, कसर, मुडा, भिलज, कोरवाडी, अंगलगाव, डोंगरतळा येथील स्थापित तालुक्यांतील सर्व सेंद्रिय शेती गटांचे प्रतिनिधींनी वर्णा येथील या भेटीदरम्यान सेंद्रिय शेती गटाने त्यांच्या सभासदांच्या शेतावर बनविलेल्या निविष्ठा यामध्ये जिवामृत, अमृतपाणी, दशपर्णी व निंबोळी अर्क अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करण्यात आली.

तसेच सी. पी. पी. कुंड, बायोडायनॅमिक कंपोस्ट डेपो, चर या बाबींचीही पाहणी करण्यात आली व शंखी गोगलगाय नियंत्रणासाठी बांधाभोवती चुन्याच्या पट्टीचे प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. चौधरी म्हणाले, की सेंद्रिय शेती काळाची गरज असून, सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगितले.

द्वितीय वर्षात सेंद्रिय शेती अंतर्गत राबवावयाच्या बाबी, सेंद्रिय शेती गटाचे कामकाज, मैनापुरी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, चांदज या कंपनीसोबत संलग्नित सर्व गटांनी भविष्यकाळात सेंद्रिय शेतीमालाची कंपनीच्या बळकटीकरणासह विक्री व्यवस्थापन या विषयांवर माहिती दिली.

‘आत्मा’अंतर्गत महाराष्ट्र स्पर्धा क्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत स्थापित वर्णेश्‍वर शेतकरी उत्पादक कंपनीचे दिलीप अंभुरे यांनी कंपनी स्थापना, कामकाज व प्रगतीबाबत उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनील अंभुरे यांनी केले, तर सूत्रसंचालन चंद्रकांत देशमुख यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT