Orange  Agrowon
ताज्या बातम्या

Orange : संत्रा बागायतदार वाय-बहरमुळे जेरीस

संत्रा पट्ट्यात गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या वाय-बहर (वाया गेलेली संत्रा फळे म्हणून याला स्थानिक भाषेत वाय-बहर म्हणतात) समस्येवरही संशोधक संस्थांना उपाय शोधता आले नाहीत.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर ः संत्रा पट्ट्यात (Orange Belt) गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या वाय-बहर (वाया गेलेली संत्रा फळे म्हणून याला स्थानिक भाषेत वाय-बहर म्हणतात) (Damage Fruit) समस्येवरही संशोधक संस्थांना उपाय शोधता आले नाहीत. परिणामी, संत्रा उत्पादकांचे (Orange Producer) सौदे निम्म्यावरच सोडत व्यापारी निघून जात आहेत. त्यामुळे संत्रा उत्पादकांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान (Loss) सोसावे लागत आहे.

सिट्रस ग्रीनिंग नावाच्या बॅक्‍टेरियामुळे वाय-बहराचा प्रादुर्भाव होतो, असे शेतकरी सांगतात. यामध्ये वेडीवाकडी फळे होतात. फळे न पिकताच गळून पळतात. त्यामुळे सुरुवातीला काही रक्‍कम देत व्यापारी लाखो रुपयांचे सौदे करतात. परंतु फळे परिपक्‍व होण्याच्या अवस्थेत त्यावर वाय-बहराचा प्रादुर्भाव दिसून येताच व्यापारी पुन्हा अशा बागांकडे फिरकतच नाहीत. त्यामुळे झाडांवरील शिल्लक थोडीफार फळे वाटेल त्या दरात विकण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय राहत नाही.

‘‘चाळीस लाख रुपयांत सौदा ठरलेल्या बागेला अशावेळी केवळ दोन लाख रुपयांत खरेदी केले जाते,’’ असे सोनोरी (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील नंदू मडगे सांगतात. त्यांच्या बागेत अडीच हजार झाडे असून, ते आंबिया बहराचे व्यवस्थापन करतात. गेल्या पाच-सहा वर्षांपासून त्यांच्यासह या परिसरातील बहुतांश बागांमध्ये जुलैच्या शेवटी वाय-बहर दिसून येतो. हा बॅक्टेरिया झाडाच्या आत असल्याने त्यावर बाहेरून केलेली फवारणी प्रभावी ठरत नाही.

मडगे म्हणाले, ‘‘ऑस्ट्रेलियावरून झाडांना देण्यासाठी असलेल्या १० इंजेक्‍शनची आयात केली. ‘फायटोप्थोरा’ नियंत्रणासाठी त्या भागात याचा वापर होतो. २२ हजार रुपयांना त्याची आयात केली. त्याचा वापरही केला; दिल्लीतील प्रयोगशाळेत पानांचे पृथक्करण करण्यात आले. परंतु हे सारे प्रयत्न निरर्थक ठरले. अशाप्रकारे अनेक प्रयत्न करूनही वाय-बहर नियंत्रणात यश आले नाही. त्यामुळे आलेल्या परिस्थितीला शरण जाण्याशिवाय दुसरा उपायच नाही.’’

एका झाडाच्या व्यवस्थापनावर ७०० रुपयांचा खर्च होतो. यंदा निविष्ठांच्या दरात वाढ झाल्याने तो खर्चही वाढला. गेल्या हंगामात व्यापाऱ्यांनी ३५ लाख रुपयांना सौदा ठरविला. परंतु वाय-बहर आल्यानंतर दोन लाख रुपयेच मिळाले. १५ वर्षांआधी लागवड केलेल्या झाडांमध्ये याचा प्रादुर्भाव दिसून येत नसला तरी त्यानंतरच्या अनेक बागांमध्ये याचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. परिणामी, रोपवाटिकेतूनच प्रादुर्भावग्रस्त रोपांचा पुरवठा झाल्याची शक्‍यता अधिक आहे.
नंदू मडगे, शेतकरी, सोनोरी, चांदूरबाजार, अमरावती
वाय-बहराचा प्रादुर्भाव वाढता असल्याने संत्रा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. संशोधन संस्थांकडून या विषयी कोणतेच मार्गदर्शन मिळत नसल्याने आम्ही हतबल आहोत. परिणामी, या भागातून अनेकांनी बागा काढल्याने संत्रा क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.
प्रमोद वासनकर, कांडली, जि. अमरावती

भारतातील वाय-बहर वेगळ्या प्रकारचा

जगातील इतरही संत्रा उत्पादक देशांमध्ये वाय-बहरची (सिट्रस ग्रीनिंगचा) समस्या आहे. परंतु भारतात आढळणारा हा व्हायरस वेगळ्या प्रकारचा आहे. फळे वेडीवाकडी झाल्यानंतर काही दिवसांत त्यांचा आकार पूर्ववत होत असल्याचे दिसून येते, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या तज्ज्ञांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

Satara ZP Election : सातारा ‘झेडपी’साठी २६ लाख ६६ हजार मतदार

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

SCROLL FOR NEXT