Sweet Orange : मोसंबी फळगळमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

पावसाच्या संततधारमुळे आडुळ (ता. पैठण) सह परिसरातील मोसंबी फळबागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
Sweet Orange
Sweet OrangeAgrowon

आडुळ, जि. औरंगाबाद : पावसाच्या संततधारमुळे (Rainfall) आडुळ (ता. पैठण) सह परिसरातील मोसंबी फळबागांमध्ये (Sweet Orange Orchard) मोठ्या प्रमाणात फळगळ (Fruit Fall) होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान (farmers Loss) होत आहे. याविषयी मार्गदर्शनाची अपेक्षा मोसंबी उत्पादक (Sweet Orange Producer) व्यक्त करीत आहेत.

Sweet Orange
Mosambi : कृषिकन्यांकडून मोसंबी बाग आराखड्याचे प्रात्यक्षिक

अगोदरच गगनाला भिडलेले मोसंबीचे भाव यंदा कमालीचे घसरल्याने शेतकरी संकटात सापडला होता. त्यात यंदा पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी परिसरात एक ही जोरदार पाऊस झाला नाही. गेल्या महिनाभर परिसरात रोज रिमझिम पाऊस पडत असल्याने कपाशी, तूर, बाजरी, मका, सोयाबीन ही पिके पिवळी पडून त्यांची वाढ खुंटली आहे. तर फळबागाधारक शेतकऱ्यांच्या मोसंबी, डाळिंब बागांना मगरी रोगाने ग्रासल्याने बागेतील अर्धे अधिक फळे गळून पडली आहेत.

Sweet Orange
Mosambi : आधी गुंडीगळ, आता फळगळ

आडुळ, कडेठाण, एकतुनी, घारेगाव, देवगाव, रजापूर, गेवराई, पारुंडी, सुलतानपूर, दाभरुळ, आडगाव, अंतरवाली खांडी, खादगाव येथे फळगळ प्रचंड प्रमाणात वाढली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मगरी रोग पडल्याने शेतकरी धास्तावले असून औषध फवारणी करूनदेखील प्रादुर्भाव कमी होत नसल्याने कृषी विभागाने परिसरात कृषी शास्त्रज्ञ बोलावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे व फळगळ झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना अर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

माझ्याकडे १२०० झाडांची बाग असून अंदाजे १० टन मोसंबी गळून खाली पडली आहे. एक तर भाव कमी दुसऱ्या बाजूला फळगळ या मुळे मोसंबीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.
सुशील तवार
माझी मोसंबीची ३०० झाडे असून दोन टन फळे खाली पडली आहेत. औषध फवारणी करूनदेखील उपयोग झाला नाही.
भागवत नाटकर
मी ४०० झाडांची फळबाग लावलेली असून मगरी रोगामुळे अंदाजे दोन ते तीन टन फळे गळून पडली आहेत.
विष्णू राठोड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com