घनसावंगी, जि. जालना : मागील आठवड्यात रिमझिम पडणारा सततचा पाऊस (Continues Rain) अन् सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे (Lack Of Sunlight) मुळांची दमकोंडी यामुळे मोसंबी पट्ट्यात (Mosmbi Belt) फळगळीचे (Fruit Fall) प्रमाण वाढीस लागत असल्याचे मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील (Dr. Sanjay Patil) यांनी सांगितले.
माणेपुरी (ता. घनसावंगी) येथे कृषी विभाग आयोजित प्रक्षेत्र भेटीदरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते बोलत होते. या वेळी तालुका कृषी अधिकारी राम रोडगे, मोसंबी बागायतदार संजय शिंदे, शेषराव वाघ, कृष्णा धडके आदी उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, की मागील आठवड्यात झालेल्या सततच्या पावसाने मुळांच्या परिसरात पाणी जमा झाले. त्यामुळे मुळांच्या परिसरात प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन मुळे अकार्यक्षम बनली आणि फळांना अन्नद्रव्ये उपलब्ध झाली नाहीत. परिणामी आंबिया बहर धरलेल्या परंतु मृगासाठी ताणावर सोडलेल्या बागेत फळगळ दिसून आली.
तसेच काही ठिकाणी पाणी साचल्याने देठाजवळ बुरशी लागून फळगळ दिसून आली. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीच्या पाण्याचा निचरा करून ताबडतोब जीए १५ ग्रॅम अधिक बेनोमिल १ किलो व १० किलो युरिया हजार लिटर पाण्यात घेऊन फवारणी केल्यास फळगळ थांबण्यास मदत होईल. याच अनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांनी शास्त्रज्ञांशी सविस्तर चर्चा करून आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.