Rain Update agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : मागच्या अडीच महिन्यात फक्त ४५ टक्के पाऊस, दुष्काळाचे सावट

Kolhapur Monsoon : कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन उशिराच झाले. जून महिन्यात अत्यंत कमी पावसाची नोंद झाली.

sandeep Shirguppe

Kolhapur Rain News : कोल्हापूर जिल्ह्यात यंदा पाऊस समाधानकारक झाला नसल्याने शेतकरी संकटात सापडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. जून महिन्यापासून ते आजपर्यंत सरासरीच्या फक्त ४५ टक्केच पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. तर पुढचे काही दिवसच पाऊस राहणार आहे यामुळे उर्वरित ५५ टक्के कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस पडणार का? याबाबत साशंकताच असून, प्रशासनानेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन उशिराच झाले. जून महिन्यात अत्यंत कमी पावसाची नोंद झाली. तुलनेत जुलै महिन्यात काहीसा चांगला पाऊस झाला. या पावसाने जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. यानंतर पुन्हा ऑगस्ट महिन्यात पावसाचाही जोर कमी झाला, तो अद्याप तसाच आहे.

जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात पडणार्‍या पावसापैकी केवळ ६६.३ टक्केच पाऊस झाला. १ ऑगस्ट ते १८ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी २८२.१ मि.मी. पावसाची सरासरी असते. परंतु या कालावधीत जिल्ह्यात ९६.३ मि.मी. इतकाच म्हणजे ३४.१ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात एक जून ते १८ ऑगस्ट या कालावधीत १३३०.५ मि.मी. इतका पाऊस होतो, यावर्षी तो ७९१.३ मि.मी. म्हणजे ५९.५ टक्के पाऊस झाला.

सर्वाधिक पाऊस पडणार्‍या तालुक्यांतही पावसाची समाधानकारक स्थिती दिसून येत नाही. राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, चंदगड या तालुक्यांत ७० टक्क्यांपेक्षा कमीच पाऊस झाला आहे. जिल्ह्यात केवळ भुदरगड आणि कागल या दोनच तालुक्यांत १८ ऑगस्टपर्यंत पडणार्‍या पावसाच्या तुलनेत १०० टक्क्यांपेक्षा जादा पाऊस झाला आहे.

आजचा धरणातील पाणीसाठा

कोल्हापूर जिल्ह्यात धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती तसेच जिल्ह्यातील बंधाऱ्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. धरणांचे नाव, आजचा पाणीसाठा (टीएमसी मध्ये) आणि धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता (टीएमसीमध्ये) कंसामध्ये दर्शविण्यात आली आहे.

राधानगरी- ८.०९ (८.३६१), तुळशी २.७४ (३.४७१), वारणा ३०.१२ (३४.३९९), दुधगंगा २१.५५ (२५.३९३ टी. एम. सी), कासारी २.५७ (२.७७४), कडवी २.४८ (२.५१६), कुंभी २.५२ (२.७१५), पाटगांव ३.४६ (३.७१६), चिकोत्रा १.३४ (१.५२२), चित्री १.८८ (१.८८६), जंगमहट्टी १.२२ (१.२२), घटप्रभा १.२४ (१.५६०), जांबरे ०.७३ (०.८२0) आंबेओहोळ १.२४ (१.२४०), कोदे ल.पा. ०.२१ (०.२१४)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT