Onion Seed Production Agrowon
ताज्या बातम्या

Onion Seed Production : खानदेशात यंदा कांदा बीजोत्पादन कमी

खानदेशात यंदा कांदा बीजोत्पादन कमी दिसत आहे. मागील हंगामात कमी दर मिळाले तसेच कांद्यासही समाधानकारक दर शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी बीजोत्पादनाखालील क्षेत्र कमी केले आहे किंवा लागवडच टाळली आहे.

टीम ॲग्रोवन

जळगाव ः खानदेशात यंदा कांदा बीजोत्पादन (Onion Seed Production) कमी दिसत आहे. मागील हंगामात कमी दर (Onion Rate) मिळाले तसेच कांद्यासही समाधानकारक दर शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी बीजोत्पादनाखालील क्षेत्र कमी केले आहे किंवा लागवडच टाळली आहे.

खानदेशात दरवर्षी ६०० ते ८०० हेक्टरवर कांदा बीजोत्पादनासंबंधी कांदा किंवा बल्ब लागवड केली जाते. परंतु यंदा यात सुमारे १०० ते १५० हेक्टरने घट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कांदा बीजोत्पादनासाठी जळगावमधील जामनेर, पाचोरा, मुक्ताईनगर, चोपडा, जळगाव हा भाग प्रसिद्ध आहे. धुळ्यात शिरपूर, साक्री, शिंदखेडा, नंदुरबारात तळोदा, शहादा, नवापूर तालुक्यात बीजोत्पादन केले जाते.

अनेक कंपन्या बीजोत्पादनासाठी करार शेती करतात. यात बीजोत्पादनाला लागणारे कांदे किंवा बल्ब, निविष्ठा व तांत्रिक मार्गदर्शन शेतकऱ्यांना पुरविले जाते. तसेच काढणी, प्रतवारी करून थेट शेतातून कांदा बियाण्याचे पॅकिंग करून कंपन्या खरेदी करतात. पण मागील वेळेस शेतकऱ्यांना दर कमी मिळाले.

ते ३०० ते ५०० रुपये प्रतिकिलो होते. तसेच नंतर करार शेतीत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांना १८० ते १०० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. यात मोठा फटका बसला. कारण उत्पादन खर्चही अनेक शेतकऱ्यांचा निघू शकला नाही. एकरी दोन ते तीन क्विंटल उत्पादन साध्य झाले.

परंतु हवे तसे दर बाजारात नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी घरात बियाणे साठविले. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये त्याचे दर आणखी कमी झाले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. परिणामी, यंदा अनेक शेतकऱ्यांनी खानदेशात बीजोत्पादन टाळले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT