
लासलगाव ः गत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ५० हजार ५४ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान ५०० रुपये, कमाल १,६६१ रुपये, तर सर्वसाधारण १,१२१ रुपये तर लाल कांद्याची ९९४ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान ५०० रुपये कमाल २,४०० रुपये, तर सर्वसाधारण १,९८३ रुपये प्रति क्विंटल राहिले.
लासलगाव मुख्य बाजार आवारावरील भुसार व तेलबिया शेतीमालाचे प्रति क्विंटल बाजारभाव पुढीलप्रमाणे होते (आवक कंसात) : गहू (४०२ क्विंटल) भाव २,५०० ते ३,३०० सरासरी २,७४१ रुपये, बाजरी लोकल (९५ क्विंटल) भाव १,८८० ते २,९९१ सरासरी २,१७८ रुपये, ज्वारी लोकल (१ क्विंटल) भाव १,८०० ते १,८०० सरासरी १,८०० रुपये, हरभरा लोकल (३७ क्विंटल) भाव ३,७०० ते ४,५५१ सरासरी ४,३४७ रुपये, हरभरा जंबू (१७ क्विंटल) भाव ३,७०० ते ६,००० सरासरी ४,५७६ रुपये, हरभरा काबुली (४३ क्विंटल) भाव ३,७०० ते ५,७०१ सरासरी ५,५५० रुपये, सोयाबीन (६,९५९ क्विंटल) भाव ३,००० ते ५,७०० सरासरी ५,४७० रुपये, मूग (९५ क्विंटल) भाव ३,००० ते ८,६०१ सरासरी ६,८६२ रुपये, मका (३६,४९० क्विंटल) भाव १,७०० ते २,१५१ सरासरी २,०४९ रुपये प्रति क्विंटल राहिले.
निफाड उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते (आवक कंसात) ः उन्हाळ कांदा (१३,२०० क्विंटल) भाव रुपये ३०० ते १,३५२ सरासरी रुपये १,०५०, सोयाबीन (४,२४२ क्विंटल) ३,००० ते ५,६३८ सरासरी ५,५३० रुपये, मका (५,४१० क्विंटल) १,५०० ते २,१०० सरासरी १,९८० रुपये, गहू (२५९ क्विंटल) २,३१० ते २,७९० सरासरी २,६८१ रुपये, मूग (६ क्विंटल) २,४०० ते ७,५०१ सरासरी ६,१०० रुपये, हरभरा (११ क्विंटल) ३,०७५ ते ७,४०० सरासरी ४,४०० रुपये प्रति क्विंटल राहिले.
विंचूर उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते (आवक कंसात) ः उन्हाळ कांदा (४९,५७९ क्विंटल) भाव रुपये ५०० ते १,६५१ सरासरी रुपये १,३००, गहू (१२९ क्विंटल) २,२०० ते ३,००१ सरासरी २,७५१ रुपये, बाजरी (९ क्विंटल) १,७०० ते २,५०० सरासरी १,८५० रुपये, मका (२६,४३८ क्विंटल) १,६०० ते २,१०० सरासरी २,०५० रुपये, सोयाबीन (६,८५२) क्विंटल ३,००० ते ५,५५१ सरासरी ५,४०० रुपये प्रति क्विंटल राहिले, अशी माहिती बाजार समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.