Fertilizer demand  Agrowon
ताज्या बातम्या

Fertilizer Demand : रब्बीसाठी एक लाख ७७ हजार टनांवर खतांची आवश्‍यकता

Rabi Season : परभणी जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई, सूर्यफूल, जवस आदी पिके घेतली जातात. यंदा अंदाजे ३ लाख हेक्टर पेरणी प्रस्तावित आहे.

Team Agrowon

Parbhani News : यंदाच्या (२०२३) रब्बी हंगामाकरिता परभणी जिल्ह्यासाठी १ लाख ७ हजार ३०० टन व हिंगोली जिल्ह्यासाठी ७० हजार २०६ टन अशी दोन जिल्ह्यात मिळून १ लाख ७७ हजार ५०६ टन विविध ग्रडेच्या रासायनिक खतांची मागणी कृषी विभागातर्फे करण्यात आली.

परभणी जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई, सूर्यफूल, जवस आदी पिके घेतली जातात. यंदा अंदाजे ३ लाख हेक्टर पेरणी प्रस्तावित आहे.

त्यानुसार विविध पिकांची गरज विचारात घेऊन ऑक्टोबर ते मार्च या कालावधीसाठी विविध ग्रेडच्या १ लाख ७ हजार ३०० टन खतांची मागणी करण्यात आली. त्यात युरिया ३६ हजार ४०० टन, सुपर फॉस्फेट ९ हजार २०० टन, पोटॅश ६ हजार टन, डीएपी २० हजार २०० टन, संयुक्त खते ३५ हजार ३५० टन, इतर १५० टन खतांचा समावेश आहे.

ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यासाठी प्रत्येकी ३२ हजार १९० टन, डिसेंबर व जानेवारी महिन्यांसाठी प्रत्येकी १६ हजार ९५ टन, फेब्रुवारी व मार्च महिन्यांसाठी प्रत्येकी ५ हजार ३६५ टन खतांची मागणी कऱण्यात आली आहे, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी दीपक सामाले यांनी सांगितले.

हिंगोली जिल्ह्यात यंदा १ लाख ८० हजार हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी होईल, असा अंदाज आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठी (ऑक्टोबर ते मार्च) विविध ग्रेडच्या ७० हजार २०६ टन खतांची मागणी करण्यात आली आहे.

त्यात युरिया १९ हजार १८० टन, सिंगल सुपर फॉस्फेट ८ हजार टन, पोटॅश ६ जार ५९७ टन, डीएपी १२ हजार ३५७ टन, संयुक्त खते (एनपीके) २४ हजार ७२ टन खतांचा समावेश आहे. महिनानिहाय खतांच्या गरजेमध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबरसाठी प्रत्येकी १७ हजार ५५१ टन, डिसेंबर व जानेवारीसाठी प्रत्येकी १० हजार ५३२ टन, फेब्रुवारीसाठी ७ हजार २१ व मार्चसाठी ७ हजार १९ टन खतांची गरज आहे, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी उत्तम वाघमारे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT