Nitin Gadkari Agrowon
ताज्या बातम्या

Nursery Technology : ‘सह्याद्री फार्म’-‘एनआरसीसी’मध्ये रोपवाटिका तंत्रज्ञान हस्तांतरण करार

Sahyadri Farms : संत्रा फळांचा दर्जा राखण्यात गुणवत्तापूर्ण रोपांची भूमिका महत्त्वाची आहे. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे तंत्रज्ञान अशा रोपांच्या निर्मितीत सहाय्यभूत ठरणार आहे.

Team Agrowon

Nagpur News : संत्रा फळांचा दर्जा राखण्यात गुणवत्तापूर्ण रोपांची भूमिका महत्त्वाची आहे. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे तंत्रज्ञान अशा रोपांच्या निर्मितीत सहाय्यभूत ठरणार आहे. जास्तीत जास्त रोपवाटिकाधारकांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था (एनआरसीसी) तसेच सह्याद्री फार्मस लिमिटेड यांच्यात रोपवाटिका तंत्रज्ञान हस्तांतरण सामंजस्य करार शनिवारी (ता. १५) पार पडला यावेळी ते बोलत होते.

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेने कंटेनरमध्ये रोगमुक्‍त कलमांच्या निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याकरिता सुरुवातीला १० लाख रुपयांचे शुल्क आकारण्यात येत होते. आता या शुल्कात दोन लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

शुल्क आकारात रोपवाटिकाधारकांना हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यावर भर आहे. त्याकरिता एनआरसीसीकडून अधिस्वीकृती दिली जाते. सह्याद्री फार्मकडून देखील येत्या काळात संत्रा रोपांची उपलब्धता करून दिली जाणार आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर लिंबूवर्गीय संशोधन संस्था तसेच सह्याद्री फार्म यांच्यात रोपवाटिका तंत्रज्ञान हस्तांतरण विषयक सामंजस्य करार पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष, सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे, महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे, संचालक मनोज जवंजाळ यांची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Eknath Shinde Meets PM Modi: एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, PM मोदींची घेतली भेट, म्हणाले, 'महायुती'नं असा निर्णय घेतलाय...

Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड सुरू

Cucumber Price: काकडीला उठाव; तसेच काय आहेत सोयाबीन, केळी, कोथिंबीर आणि बाजरीचे आजचे बाजारभाव

Crop Loan : पीककर्ज वसुली बंद होईना

Agrowon Podcast: कोथिंबीरचा भाव टिकून, सोयाबीनचा भाव दबावातच, केळीची आवक टिकून, बाजरी नरमली तर काकडीला उठाव

SCROLL FOR NEXT