Onion Nursery Production : कांदा रोपवाटिका निर्मितीला वेग

Onion Cultivation : कांद्यासाठी खानदेशात धुळे जिल्हा प्रसिद्ध आहे. धुळ्यात खरिपातील सर्वाधिक लागवड केली जाते. तेथे यंदा सात ते साडेसात हजार हेक्टरवर कांदा लागवड होईल, असे सांगितले जात आहे.
Onion Farming
Onion FarmingAgrowon
Published on
Updated on

Jalgaon Onion Update : खानदेशात कांदा लागवडीसंबंधीची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. अनेकांनी लागवडीसंबंधी रोपवाटिका निर्मिती सुरू केली असून, यंदा लागवड किती होईल, याबाबत वेगवेगळे अंदाज येत आहेत.

कांद्यासाठी खानदेशात धुळे जिल्हा प्रसिद्ध आहे. धुळ्यात खरिपातील सर्वाधिक लागवड केली जाते. तेथे यंदा सात ते साडेसात हजार हेक्टरवर कांदा लागवड होईल, असे सांगितले जात आहे.

जळगाव जिल्ह्यातही अडीच ते तीन हजार हेक्टर आणि नंदुरबारातही सुमारे ९०० ते एक हजार हेक्टरवर कांदा लागवड होईल, असा अंदाज आहे. कांद्याचे दर मागील काही महिने दबावात आहेत. अनेकांचे मागील हंगामात बेमोसमी पावसात नुकसान झाले. यामुळे अनेक शेतकरी लागवड कमी करण्याचे नियोजन करीत आहेत.

परंतु लागवडीत मोठी घट होणार नाही, असेही दिसत आहे. खानदेशात यंदा सुमारे ३०० ते ४०० हेक्टरवर रोपवाटिका असणार आहेत. यातील सर्वाधिक क्षेत्र धुळ्यात राहील. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात रोपवाटिकांची संख्या किंवा क्षेत्र असणार आहे.

जळगावात चोपड्यातील अडावद, धानोरा, यावलमध्ये किनगाव, दोनगाव, डांभुर्णी, धुळ्यात लामकानी, कुसुंबा, कापडणे, साक्रिमधील पिंपळनेर आदी भागातील रोपवाटिका प्रसिद्ध आहेत.

Onion Farming
Onion Market : उन्हाळ कांद्याच्या दरात मागणीमुळे सुधारणा

हवा तसा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी सिंचनासंबंधी ठिबक, मिनी तुषार सिंचनाची व्यवस्था करून रोपवाटिका तयार केल्या आहेत. रोपवाटिकांसाठी मध्यम, पाण्याचा निचरा होणारी उताराची जमीन शेतकऱ्यांनी निवडली आहे.

कारण अशा क्षेत्रात अधिकचा पाऊस आल्यास नुकसानीची भिती कमी असते. लागवडीसंबंधीच्या बियाण्याची खरेदी काही शेतकरी आपल्या परिचयातील गावांमधील विक्रेत्यांकडून करून घेत आहेत. तर काही शेतकरी प्रमाणित बियाणे कृषी केंद्रातून मागवून घेत आहेत.

अनेक शेतकऱ्यांच्या रोपवाटिका १० ते १२ दिवसांच्या झाल्या आहेत. रोपांची उगवण बऱ्यापैकी आहे. रोपवाटिकांमध्ये बियाणे पेरणीच्या वेळेस जोरदार पाऊस नव्हता. यामुळे उगवण व्यवस्थित असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

...या भागात होते रोपवाटिकांची निर्मिती

कांदा रोपवाटिकांची निर्मिती धुळ्यातील साक्री, धुळे, शिंदखेडा, जळगावमधील चोपडा, यावल, धरणगाव, एरंडोल, जामनेर या भागांत सुरू आहे.

अनेक शेतकरी व्यावसायिक रोपवाटिका तयार करीत आहेत. तर काही शेतकरी आपल्या क्षेत्रापुरती लागवड करण्यासंबंधी रोपवाटिकांचे नियोजन करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com