Farmer Death Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Suicide : शेतकरी आत्महत्या रोखण्याबाबत नीलम गोऱ्हेंचे मुख्य सचिवांना पत्र

नुकसानीमुळे शेतकरी व्यथित झाले असून, अमरावतीमध्ये दहा तर यवतमाळ जिल्ह्यात तीनपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

टीम ॲग्रोवन

पुणे ः राज्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांमध्ये सोयाबीन आणि कापूस पिकांचे (Soybean Cotton Crop) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे शेतकरी व्यथित झाले असून, अमरावतीमध्ये दहा तर यवतमाळ जिल्ह्यात तीनपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Death) केल्या.

परतीच्या पावसाचा कहर व नापिकीचा सर्वांत जास्त फटका बसलेल्या विदर्भात पहिल्या नऊ महिन्यांतच अकराशेहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे समोर येत आहे. आत्महत्या रोखण्याबरोबरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

या बाबत करावयाच्या मदत आणि उपाययोजनांमध्ये मागील तीन महिन्यांच्या काळात झालेल्या शेतकरी आत्महत्यांचे पंचनामे आणि शवविच्छेदन अहवाल तातडीने पूर्ण करावेत. संबंधित तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनी त्यांचे स्तरावरील बैठका घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना आर्थिक साह्य देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी.

बदलत्या हवामानामुळे विदर्भ व मराठवाड्यात पीक पद्धती बदलणे ही आवश्यक आहे. या ही दृष्टीने नियोजन करावे. अतिवृष्टीमुळे प्राप्त झालेल्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजनासाठी आवश्यक उपाय योजना कराव्यात.

विधवा झालेल्या पत्नीचे शासकीय स्तरावरून समुपदेशन करण्याची व्यवस्था करण्यात यावी. विधवांची व त्यांच्या वारसांची नावे आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या मालमत्तांना वारसांची नावे लावण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, अशा सूचना दिल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गहू दरात सुधारणा, उडीद दर टिकून, बटाटा बाजारात चढ-उतार, पेरू दरात तेजी, चिकू दरात चढ-उतार

Shri Mangal Wheat: ‘श्री मंगल’ गव्हाचा नवा वाण ; हेक्टरी ५२ क्विंटल उत्पादनाची क्षमता

Crop Damage Survey: अहिल्यानगरला साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण

Shivraj Singh Chouhan: काँग्रेसच्या सलग पराभवाला कारण कोण? शिवराज सिंह चौहान यांचा राहुल गांधींवर निशाणा

Monsoon Return: देशाच्या उर्वरित भागांतून मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती; राज्यात उन्हाचा चटका कायम

SCROLL FOR NEXT