Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Indian Agriculture : आर्थिक स्थैर्याकरिता शेतीपूरक उद्योगांची गरज

आर्थिक स्‍थैर्याकरिता शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून राहून भागणार नाही. कृषीपूरक उद्योग करण्‍याची गरज आहे. आगामी काळात परभणी कृषी विद्यापीठ शेतकरी व ग्रामीण युवकांच्‍या कौशल्‍य विकासाकरिता विविध प्रशिक्षण आयोजित करणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

टीम ॲग्रोवन

परभणी ः आर्थिक स्‍थैर्याकरिता (financial Stability) शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून राहून भागणार नाही. कृषीपूरक उद्योग करण्‍याची गरज आहे. आगामी काळात परभणी कृषी विद्यापीठ शेतकरी व ग्रामीण युवकांच्‍या कौशल्‍य विकासाकरिता विविध प्रशिक्षण आयोजित करणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी (Dr. Indra Mani) यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील किटकशास्‍त्र विभागाअंतर्गत असलेल्‍या रेशीम संशोधन योजना आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी यांच्या संयुक्त विद्यामाने किमान कौशल्‍य विकास कार्यक्रमाच्‍या जिल्‍हास्‍तरीय योजना २०२२-२३ अंतर्गत तीन महिन्यांच्या रेशीम उद्योजक प्रशिक्षणाचे उद्‍घाटन गुरुवारी (ता. २२) झाले, त्या वेळी कुलगुरू डॉ. इंद्र मणी बोलत होते.

कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. प्रशांत खंदारे, प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माइल, जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम, केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्‍त्रज्ञ अशोक जाधव, विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहेरकर, रेशीम तज्ज्ञ डॉ. चंद्रकात लटपटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

खंदारे म्‍हणाले, की हे प्रशिक्षण ग्रामीण भागातील युवकांत उद्योजकता विकास व्हावा, रेशीम उद्योजक निर्माण व्हावेत या उद्देशाने आयोजित करण्‍यात आले आहे. डॉ. लटपटे यांनी रेशीम कीटकांचा जीवनक्रम, रेशीम कीटकसंकरवाण निर्मिती, विद्यापीठातील संशोधन कार्य याबाबत मार्गदर्शन करून प्रशिक्षणाची सविस्‍तर माहिती दिली. सूत्रसंचालन वरिष्ठ संशोधन सहायक धनंजय मोहोड यांनी केले.

आभार डॉ. नेहेरकर यांनी मानले. डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. अनंत लाड, पाणी व्यवस्थापन योजनाचे प्रभारी अधिकारी डॉ. हरीश आवारी, ऊत्ती संवर्धन प्रयोगशाळेचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद दौडे, डॉ. प्रवीण घाडगे आदींसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. परभणी जिल्ह्यातील ४० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sunflower Farming: कमी कालावधीच्या सूर्यफूल वाण पेरणीस पसंती

Subsidized Electricity Scheme: कृषिपूरक व्यवसायांना लवकरच सवलतीच्या दराने वीज

Watermelon Harvesting: गोड, दर्जेदार कलिंगडांसाठी उन्हाळ्यात काळजी आणि योग्य वेळी काढणी गरजेची

Agri Administration Discussion: नव्या गुणनियंत्रण संचालकाची चर्चा

Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

SCROLL FOR NEXT