Agriculture Export : शेतीमालाची निर्यात जलदगतीने करणार : गडकरी

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे २२६ किलोमीटरच्या महामार्गाचे उद्घाटन गडकरी यांनी केले. या महामार्गासाठी १८३० कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.
Nitin Gadkari
Nitin GadkariAgrowon

"नाशिक (Nashik) जिल्ह्यातील द्राक्ष (Grape) आणि कांदा (Onion) उत्पादनाच्या निर्यातीसाठी इगतपुरी (Egatpuri) येथील २२६ किलोमीटर महामार्ग महत्त्वपूर्ण ठरेल. यातून शेतीमालाची निर्यात-आयात सोपी होईल. नाशिकला देशांमध्ये अधिक महत्त्व मिळावे म्हणून विकास कामे अधिक गतीने सुरू आहेत. या महामार्गातून नाशिकमध्ये रोजगार आणि संधी उपलब्ध होतील." अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

ते महामार्गाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे २२६ किलोमीटरच्या महामार्गाचे उद्घाटन गडकरी यांनी केले. या महामार्गासाठी १८३० कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.

Nitin Gadkari
Soya DOC Export : सोयापेंड निर्यात जोमात;सोयाबीन आधार मिळेल का?

ते पुढे म्हणाले, "एकूण २०५ किलोमीटर लांबीच्या सात महामार्गाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यासाठी १५७७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यातील भागांचाही यामध्ये समावेश आहे. तसेच गोंडे-पिंपरी दरम्यान सहा लेनचा महामार्ग तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ज्यामुळे शेतीमालाचे निर्यात-आयात सुलभ होईल."

भविष्यात वाडपे महत्त्वाचे जंक्शन म्हणून उदयास येणार आहे. त्याचा फायदा मुंबईच्या जेएनपीटी पोर्टला होईल. परिणामी आयात-निर्यात अधिक सुलभतेने होईल. वाडपेमधून दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान जलदगतीने होईल. त्यामुळे नाशिकचे महत्त्व अधिक वाढेल. त्यामुळे नाशिकमध्ये विकास कामांना गती देण्यात येणार आहे, असंही गडकरी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com