Marathwada Rain  Agrowon
ताज्या बातम्या

Marathwada Rain Update : मराठवाड्यात पाच जिल्ह्यांतील ९४ मंडलांत मध्यम ते दमदार पाऊस

Marathwada Rain : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर व धाराशिव या पाचही एक-दोन मंडलांचा अपवाद वगळता २९५ मंडलांत पावसाची हजेरी लागली.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर व धाराशिव या पाचही एक-दोन मंडलांचा अपवाद वगळता २९५ मंडलांत पावसाची हजेरी लागली. त्यापैकी ९४ मंडलांत मध्यम ते दमदार पाऊस झाला. तर इतर मंडलांत पावसाची हजेरी तुरळक ते हलक्या स्वरूपाची राहिली. धाराशिवमधील दोन मंडलांत अतिवृष्टी झाली.

छत्रपती संभाजीनगरमधील सर्व ८३ मंडलांत पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील २७ मंडलांत २० ते ५३ मिलिमीटर दरम्यान, तर ३१ मंडलांत १० ते २० मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. इतर मंडलांत पावसाची हजेरी तुरळक हलक्या स्वरूपाची राहिली. बीड जिल्ह्यातील सर्व ६३ मंडलांत हलका मध्यम ते दमदार पाऊस झाला.

जिल्ह्यातील २९ मंडलांत २० ते ५५.५ मिलिमीटर दरम्यान, तर इतर मंडलांत तुरळक हलका पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४७ मंडलांत पावसाची हजेरी लागली. जिल्ह्यातील १० मंडलांत २० ते ४०.८ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला.

जिल्ह्यात पावसाची हजेरी तुरळक, हलकी, मध्यम, तर काही मंडलांत दमदार स्वरूपाची राहिली लातूर जिल्ह्यातील सर्व ६० मंडलांत तुरळक, हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील १९ मंडलांत १० मिलिमीटरच्या पुढे पावसाची नोंद झाली. धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर थोडा अधिक राहिला.

जिल्ह्यातील सर्व ४२ मंडलांत पावसाची हजेरी लागली. त्यापैकी २६ मंडलांत २० मिलिमीटरच्या पुढे पाऊस झाला. जिल्ह्यातील धाराशिव ग्रामीण मंडलात ८७ मिलिमीटर, तर येरमाळा मंडलात ७७ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली. पडलेला पाऊस पिकांना संजीवनी देऊन गेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT