Marathwada Rain : धाराशिव, लातूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस

Dharashiv Rain : जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत तुरळक
Marathwada Rain
Marathwada Rain Agrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा

Marathwada Rain Update : छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील धाराशिव व लातूर या दोन जिल्ह्यांत मंगळवारी (ता.२५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यांत मात्र चार दोन मंडलांचा अपवाद वगळता पावसाची हजेरी तुरळक राहिली.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत छत्रपती संभाजीनगरमधील ८३ पैकी ६२ मंडलांत हलका पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४८ मंडलांत हलका, बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ६१ मंडलांत तुरळक, लातूर जिल्ह्यातील ६० पैकी ५९ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. यापैकी ४८ मंडलांत १० ते ५८.३ मिलिमीटर पाऊस झाला. निलंगा तालुक्यातील हलगरा मंडलात ५८.३ मिलिमीटर तर औराद शहाजानी मंडलात ५१.५ मिलिमीटर पाऊस झाला.

धाराशिव जिल्ह्यातील ४२ पैकी ४१ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. त्यापैकी ३४ मंडलांत १० ते ३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवारी (ता.२५) दुपारपर्यंत छत्रपती संभाजी नगर शहर परिसरासह खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर परिसरात हलका पाऊस झाला.

Marathwada Rain
Marathwada Rain : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात सर्वदूर हलका, मध्यम ते दमदार पाऊस

सार्वत्रिक मुसळधारेची प्रतीक्षा

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत आजवर काही मंडळांचा अपवाद वगळता अपेक्षित पाऊस झालेलाच नाही. मंडळाच्या गावात पाऊस झाला असला तरी त्या मंडळातील इतर गावांत व मंडळाच्या ठिकाणी मोजल्या गेलेल्या पावसाच्या प्रमाणात बरीच तफावत आहे. त्यामुळे मराठवाड्यात सार्वत्रिक जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पीक जिवंत ठेवणारा व तण पोसणारा पाऊस होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ढगांची गर्दी कायम राहत असल्याने कीड रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com