Milk production Agrowon
ताज्या बातम्या

Milk Production : स्वातंत्र्यानंतर देशात १० पटीने दूध उत्पादन वाढले : अमित शहा

आपल्या देशात जगातील सर्वाधिक अशा १२६ दशलक्ष लिटर दूध प्रक्रियेची क्षमता आहे.

Team Agrowon

Dairy Industry Update गांधीनगर, गुजरात : स्वातंत्र्यानंतर १९७० ते २०२२ दरम्यान भारताची लोकसंख्या चार पटीने, तर डेअरी उद्योगामुळे (Dairy) आपल्या देशातील दूध उत्पादन (Milk Production) दहा पटीने वाढले, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी येथे केले.

गांधीनगर येथे शनिवारी (ता. १८) आयोजित ४९व्या डेअरी उद्योग अधिवेशनाच्या उद्‌घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री शहा बोलत होते. मंत्री शहा म्हणाले, ‘‘आपल्या देशात जगातील सर्वाधिक अशा १२६ दशलक्ष लिटर दूध प्रक्रियेची क्षमता आहे.

देशाच्या विकासात डेअरी उद्योगाचे योगदान आहे. शेतकऱ्यांकरिता काम करणाऱ्या सहकारी दूध संस्थांचे योगदान खूप मोठे आहे. गरीब शेतकरी आणि महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी सहकारी दूध संघांची मदत झाली आहे.’’

मंत्री शहा म्हणाले, ‘‘भारतीय अर्थव्यवस्थेचा डेअरी उद्योग हा महत्त्वाचा घटक आहे. १० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक योगदान डेअरी क्षेत्राचे आहे आणि सुमारे ४५ कोटी लोक या क्षेत्राशी संबंधित आहेत.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar | अतिवृष्टीने पिकांचे नुकसान, शेतकरी संकटात, सरकारने लक्ष द्यावे- शरद पवार

Crop Advisory: कृषी सल्ला: कोकण विभाग

Trade War: व्यापारयुद्धात शेतकऱ्यांचे हित सांभाळा!

Agriculture Growth Rate: आकड्यांत अडकलेला विकास

Rain Crop Damage: पावसाने सोयाबीन, कापूस पिकांची हानी

SCROLL FOR NEXT