Milk Collection : महिला आर्थिक विकास मंडळ, खासगी डेअरी यांच्यात करार

भंडारा जिल्ह्यातील ८८ दूध संकलन केंद्राचे, तर गडचिरोली जिल्ह्यातील १२ दूध संकलन केंद्रांचे दूध दिनशा डेअरीला देण्याकरिता करार करण्यात आले.
Milk Collection
Milk CollectionAgrowon

Bhandara News : महिला आर्थिक विकास महामंडळ व दिनशा डेअरीच्या संयुक्त विद्यमाने मविम प्रांगण बुटीबोरी येथे दूध संकलन केंद्रांतील (Milk collection center) दूध दिनशा डेअरीला देण्याकरिता भंडारा (Bhandara) व गडचिरोलीतील (Gadchiroli) मविम स्थापित लोकसंचालित केंद्रांत करार करण्यात आला.

भंडारा जिल्ह्यातील ८८ दूध संकलन केंद्राचे, तर गडचिरोली जिल्ह्यातील १२ दूध संकलन केंद्रांचे दूध दिनशा डेअरीला देण्याकरिता करार करण्यात आले.

याप्रसंगी दिनशा फूड प्रायव्हेट लिमिटेड बुटीबोरी नागपूर येथे लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष, व्यवस्थापक, दूध संकलन सखी, उपजीविका सल्लागार यांच्याकरिता दूध संकलन व प्रक्रिया उद्योगाची पाहणी करण्याकरिता अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.

Milk Collection
Mahanand Milk : दूधपुरवठ्याअभावी ‘महानंद’ला घरघर

यादरम्यान दिनशा डेअरीच्या प्लांटमध्ये उत्पादित केल्या दुग्धजन्य पदार्थ, बेकरी तसेच खाद्य पदार्थांची निर्मितीची पाहणी करण्यात आली. या प्रसंगी मविम नागपूर विभागाचे विभागीय मूल्यमापन व संनियंत्रण अधिकारी राजू इंगळे, दिनशाचे उपाध्यक्ष डॉ. अजय उपाध्याय, यवतमाळचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखेडे, नागपूरचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी ललिता दारोकर, भंडाराचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, गडचिरोलीचे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन देवतळे, दिनाचे डॉ. संजय पाटीदार, गोविंद जांजळकर यांच्यासह लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष, व्यवस्थापक आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक प्रदीप काठोळे यांनी केले. विभागीय मूल्यमापन व संनियंत्रण अधिकारी राजू इंगळे यांनी मार्गदर्शन केले.

दिनशाचे डॉ. संजय पाटीदार यांनी मार्गदर्शन केले. उपाध्यक्ष डॉ. अजय उपाध्याय यांनी मनोगत व्यक्त केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com