Irrigation
Irrigation Agrowon
ताज्या बातम्या

Irrigation : खानदेशात अनेक सिंचन प्रकल्पांत ठणठणाट

टीम ॲग्रोवन

जळगाव : खानदेशात पुन्हा एकदा पावसाचे आगमन (Khandesh Rain Update) झाले आहे. पण काही भागांत दमदार पाऊस (Heavy Rain) झालेला नाही. यामुळे अनेक सिंचन प्रकल्प कोरडे (Irrigation Project In Khandesh Still Dry) आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील अग्नावती, बहुळा, मन्याड, अंजनी हे प्रकल्प भरण्याची प्रतीक्षा आहे.

तापी नदीवरील हतनूर (ता. भुसावळ) येथील हतनूर प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडे आहेत. त्यातून विसर्ग सुरू आहे. गिरणा नदीवरील चाळीसगावनजीकच्या गिरणा धरणाचे दोन दरवाजे उघडे आहेत. जिल्ह्यातील रावेरातील सुकी, मंगरूळ, यावलमधील गारबर्डी, जामनेरातील तोंडापूर, पारोळ्यातील बोरी हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. पण यावलमधील मोर, पाचोऱ्यातील अग्नावती व बहुळा, भोकरबारी, चाळीसगावमधील मन्याड, एरंडोलातील अंजनी हे प्रकल्प १०० टक्के भरलेले नाहीत.

धुळ्यातील अमरावती, कनोली, करवंद, सोनवद, वाडीशेवाडे, शिरपुरातील अनेर हे प्रकल्पदेखील १०० टक्के भरलेले नाहीत. धुळ्यात बुराई, पांझरा, मालनगाव, बुराई हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. विविध भागांतील आर्थिक उलाढाल सिंचन प्रकल्पातील जलसाठा व पावसावर अवलंबून असते. ऑगस्टचा पहिला आठवडा संपला. मात्र अनेक प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात जोरदार पाऊस झालेला नाही. पाऊस सर्वत्र आहे, पण तो कमी अधिक, तुरळक, हलका, असा आहे. यामुळे अनेक प्रकल्प कोरडे आहेत.

चाळीसगावनजीकच्या गिरणा धरणाचे लाभक्षेत्र नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिकमध्ये चांगला पाऊस जुलै व या महिन्यातही झाला. यामुळे गिरणा धरण सलग चौथ्या वर्षी भरले आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठे म्हणजेच १८ टीएमसी एवढी क्षमता गिरणा धरणाची आहे. गिरणा पट्ट्यात त्याचा चांगला लाभ रब्बीसह टंचाई दूर करण्यासाठीदेखील होणार आहे.

नंदुरबारमधील दरा, सुसरी व इतर तीन लघू प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. शहादा तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी मागील आठवड्यातही झाली आहे. यामुळे नद्या, नाल्यांना प्रवाही पाणी आहे.

‘अग्नावती’ कोरडाच

नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील अग्नावती प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून प्रकल्प सुरवातीलाच भरत होता. त्या मुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान होते. अग्नावती नदी फेब्रुवारी महिन्यात देखील प्रवाही होती. पण अग्नावतीत शून्य टक्के पाणीसाठा आहे. शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT