Drip Irrigation: ठिबक सिंचन अनुदानात केला लाखोंचा घोटाळा

Team Agrowon

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात कृषी खात्याचे अनुदान (Irrigation Subsidy) लाटण्याचा प्रकार घडलाय. त्यासाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत खोटी बिले (fraud Bill) सादर केल्याच गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

संबंधित विक्रेत्याकडून सुमारे ३५ लाख ७२ हजार ७७१ रुपयांची वसुली करण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षकांनी दिले आहेत. या प्रकरणी सुनावणी झाली आहे.

या प्रकरणाशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करावी. आणि चौकशीचे अहवाल तातडी द्यावेत असे आदेश मेहकरच्या उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सिंदखेडराजा येथील ठिबक वितरक जय भवानी कृषी केंद्राचा संचालक सुरेश चव्हाण यांनी स्वतःवरील कर्ज कमी करण्यासाठी ड्रीप इंडिया या कंपनीकडील बनावट बिल सादर करून साठा वाढण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रत्यक्ष कंपनीने इनव्हॉइसनिहाय पुरवठा दिला तो त्यानुसार जुळलेला नाही. कंपनी इंजिनिअर, प्रतिनिधीने जास्त ठिबकच्या सादर केलेल्या प्रस्तावावर व संकल्प आराखड्यावर सहीसुद्धा केलेली नसल्याचे लेखी कळवले आहे.

या सिंचन साहित्याची मोका तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप संबंधिताने केलेला आहे. मात्र, २६ जुलैला जिल्हा अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीदरम्यान सिंदखेडराजा तालुक्यातील कृषी विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी असे पैसे घेतल्याचा आरोप शब्दात नाकारला.

दुसरीकडे या प्रकरणात दुर्लक्ष झाल्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी व विषय पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आहे.

तसेच जय भवानी कृषी सेवा केंद्राच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश सिंदखेडराजा तालुका कृषी अधिकाऱ्यांना जिल्हा अधीक्षकांनी दिले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.