Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पिकांचे पंचनामे करा

कृषिमंत्री सत्तार यांचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश

टीम ॲग्रोवन

मुंबई : ‘‘परतीच्या पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातल्याने नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे (Crop Damage) करावेत,’’ असे आदेश कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी बुधवारी (ता.१९) दिले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मुख्य सचिवांशी सत्तार यांनी चर्चा करत पावसाची आणि संभाव्य नुकसानीची आकडेवारी सादर केली.

राज्यात यंदाच्या खरीप हंगामात २९७ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या १५ दिवसांत सरासरी सात दिवस पडला. त्यामुळे पक्व आणि काढणी झालेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील बहुतांश सर्वच जिल्ह्यात अतिवृष्टीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यात भात, सोयाबीन आणि भुईमुगाचे मोठे नुकसान झाले आहे.

सत्तार म्हणाले, ‘‘यंदाच्या खरीप हंगामात नुकसान झाल्याने ३८ लाख ७० हजार शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना ऑनलाइन तर ३८ हजार ऑफलाइन सूचना दिल्या आहेत. यापैकी नऊ लाख शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी सूचना दिली आहे. त्यापैकी २८ लाख ६९ हजार शेतकऱ्यांचे सर्व्हे सुरू आहेत.’’

गेल्या काही दिवसांत राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यात रत्नागिरी, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, पुणे, सोलापूर, सांगली, जालना, लातूर, नांदेड, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूरमध्ये ६५ मि. मी. च्या वर पाऊस पडला.

तर रत्नागिरीत १०६ आणि सांगली जिल्ह्यांतील वाळवा, इस्लामपूर येथे ११२. ७ मि. मी. पाऊस झाला आहे. त्याखालोखाल सोलापूर आणि नांदेड जिल्ह्यात अनुक्रमे ८५ आणि ७४ मि. मी. पाऊस पडला. त्यामुळे गेल्या सोयाबीन, भात, कापूस, भुईमुगाचे नुकसान झाले आहे.

पावसाचा आणि नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सत्तार यांच्या दालनात बैठकांचे सत्र सुरू आहे. सत्तार यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश दिले. ज्या शेतकऱ्यांचे याआधी पंचनामे होऊन भरपाई मिळाली आहे, त्यांचे पंचनामे करू नयेत, असेही निर्देश दिले.

संयुक्त अहवालानंतर मदतीबाबत तातडीने निर्णय घेऊ. पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मळणी झालेल्या धान्याचे तर नुकसान होतेच, शिवाय काढणीला आलेल्या पिकांना कोंब येत आहेत. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिली. लवकरच पंचनामे होऊन मदत मिळेल.

- अब्दुल सत्तार, कृषिमंत्री.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT