Water Award  Agrowon
ताज्या बातम्या

National Water Award : महाराष्ट्राने पटकाविले तीन राष्ट्रीय जल पुरस्कार

Water Conservation : विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने आज चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Team Agrowon

New Delhi News : पाणी व्यवस्थापन, जलसंवर्धन आणि पाण्याचा पुनर्वापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल राज्यातील सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेस, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला आणि भारतीय जैन संघटनेस उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते राष्ट्रीय जल पुरस्काराने गौरविण्यात आले.

येथील विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने आज चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल आणि विश्वेश्वर टुडू, केंद्रीय सचिव पंकजकुमार आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार या प्रकारात जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला तिसरा पुरस्कार मिळाला. सरपंच दत्तू निंबाळकर यांनी तो स्वीकारला. सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यामधील मलकापूर नगर परिषदेस उत्कृष्ट नागरी स्थान‍िक संस्था या प्रकारात तिसरा पुरस्कार केंद्रीय मंत्री शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नगराध्यक्ष नीलम येडगे आणि उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा समितीचे सभापती मनोहर शिंदे यांनी तो स्वीकारला.

‘स्वयंसेवी संस्था’मधून ‘बीजेएस’चा गौरव

स्वयंसेवी सामाजिक संस्था या प्रकारात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पुणे येथील ‘भारतीय जैन संघटनेस’ (बीजेएस) तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे प्रमुख शांतिलाल मुथा आणि सहायक संचालक स्वप्ना पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Blockchain Technology: कृषी पुरवठा साखळीसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान

Cotton Farming: कपाशीच्या शाश्‍वत उत्पादनासाठी काटेकोर नियोजनावर भर

Rural Banks: गरिबांना अखेर वाली तो कोण?

Bogus Agriculture Inputs: बनावटगिरीला हवा कायद्याचा धाक

Agriculture Support: भीज पावसामुळे ऊस, तरकारी पिकांना नवसंजीवनी

SCROLL FOR NEXT