Agriculture Award : वसंतराव नाईक गौरव पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठवा

Vasantrao Naik Agriculture Award : विक्रमी उत्पादन घेणाऱ्या निवडक कर्तबगार शेतकऱ्यांना तसेच कृषी तज्ज्ञांना वसंतराव नाईक गौरव पुरस्कार देऊन हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनी गौरविण्यात येईल.
Vasantrao Naik Award
Vasantrao Naik Award Agrowon
Published on
Updated on

Vasantrao Naik Agriculture Award : विक्रमी उत्पादन घेणाऱ्या निवडक कर्तबगार शेतकऱ्यांना तसेच कृषी तज्ज्ञांना वसंतराव नाईक गौरव पुरस्कार देऊन हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनी गौरविण्यात येईल.

वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे हा कार्यक्रम १८ ऑगस्ट रोजी पुसद येथे होईल. या पुरस्कारासाठी येत्या १० जुलैपर्यंत शेतकरी व कृषी शास्त्रज्ञांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश, कोकण अशा विभागांतून विभागनिहाय शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत विविध प्रयोग करून विक्रमी उत्पादन आणि अधिक नफा प्राप्त केला असल्यास आपला जीवनालेख (बायोडाटा) पाठवावा. त्यामध्ये खर्च किती, उत्पादन (टनांमध्ये) किती व बाजारपेठेत विक्री केल्यानंतर किती निव्वळ नफा झाला, याची सविस्तर माहिती द्यावी.

Vasantrao Naik Award
Agriculture Award : श्रमजीवी शेतकरी कंपनीला चेंज मेकर अवॉर्ड

यावर्षी शास्त्रज्ञांकरिता “औषधी व सुगंधी वनस्पतीवर विशेष कार्य करण्याबद्दल” हा विषय निवडला आहे. ज्यांनी त्यावर विशेष संशोधनात्मक कार्य केले आहे, अशाच शास्त्रज्ञांनी त्यांचा जीवनालेख (बायोडाटा) आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा.

Vasantrao Naik Award
Agriculture Award : कृषी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

कृषीविषयक आणि कृषी संलग्नित क्षेत्रात विशेष कार्य कार्य करणाऱ्या शेतकरी, उत्पादक कंपनी, सामुहिक शेती यांनी देखील सविस्तर माहितीसह प्रस्ताव पाठवावा. वरील सर्वांनी आपले प्रस्ताव दोन पासपोर्ट छायाचित्रांसह १० जुलै २०२३ पर्यंत पोहोचतील, अशा बेताने पाठविण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक आसेगावकर यांनी केले आहे.

पत्रव्यवहाराचा पत्ता ः

कृषिभूषण दीपक आसेगावकर,

अध्यक्ष, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, पुसद

श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयासमोर

पुसद - ४४५ २०४, जि. यवतमाळ

कार्यालय संपर्क :९९२२५५२२२२, ७५८८०४३०३६

ई-मेल :- vppusad@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com