Agriculture Honor Award : बळीराजा गौरव कृषी सन्मान पुरस्कारांचे उद्या वितरण

Agriculture Award : वडनेरभैरव (ता. चांदवड) येथे शनिवारी (ता. ३) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्रस्तरीय सलादेबाबा बळीराजा गौरव कृषी सन्मान सोहळा होत आहे.
Agriculture Awards
Agriculture AwardsAgrowon
Published on
Updated on

Nashik News : वडनेरभैरव (ता. चांदवड) येथे शनिवारी (ता. ३) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्रस्तरीय सलादेबाबा बळीराजा गौरव कृषी सन्मान सोहळा होत आहे. अध्यक्षस्थानी गौतम पाटील असतील, अशी माहिती आयोजक मनोहर पाटोळे, उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, सचिव राहुल पाचोरकर यांनी दिली आहे.

Agriculture Awards
Holkar Award : कर्तबगार महिलांचा होळकर पुरस्काराने उद्या राज्यभर सन्मान

राज्यस्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या मंडळातर्फे नाशिक, धुळे, जळगाव, नगर आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील प्रगतिशील तीस शेतक्ऱ्यांना सलादेबाबा कला क्रीडा व कृषी मंडळ ट्रस्टतर्फे सलादेबाबा बळीराजा गौरव कृषिसन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी साडे पाचला जनता विद्यालय, वडनेर भैरव येथे होईल.

या सोहळ्यास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची विशेष उपस्थिती असेल. ‘कादवा’ कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, आमदार दिलीप बनकर, ‘मविप्र’चे सरचिटणीस नितीन ठाकरे, माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, शिरीषकुमार कोतवाल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (शेतकरी) संपतराव वक्ते, अनिल कदम यांच्यासह मन्यवर उपस्थित राहतील.

‘कादवा’ कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजी बस्ते, निवृत्ती माळी, कोंडाजी पाचोरकर, भास्करराव निफाडे, दौलतराव भालेराव यांना कृषी क्षेत्रातील प्रगतिशील शेतकरी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

सल्लागार दत्तात्रय निखाडे, विश्वस्त दीपक पाचोरकर, सुरेश उशीर, महेंद्रसिंग परदेशी, अनिल पवार, उत्तम भोसले, जमदाडे, कायदेशीर सल्लागार पोपटराव पवार, कार्यक्रमाचे संयोजक दत्तात्रय शिंदे, मानसिंग धोंमसे, युवराज सगर या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com