Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Pune Rain Update : पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात हलक्या सरी

Team Agrowon

Pune News : पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात रविवारी (ता. १७) पावसाच्या हलक्या सरी पडल्या. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मावळातील कार्ला येथे २९ मिलिमीटर पाऊस पडला.

त्यामुळे भात पिकांना काहीसा दिलासा मिळाला. पिके काही प्रमाणात तरारली आहेत. परंतु पूर्व भागातील शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यांत काही अंशी ढगाळ वातावरण आहे. अजूनही शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

हवेलीतील खेड, भोसरी, कळस येथे तुरळक सरी पडल्या. तर पुणे वेधशाळा, केशवनगर, कोथरूड, खडकवासला, थेऊर, उरुळीकांचन, चिंचवड, हडपसर, वाघोली ढगाळ वातावरण होते. मुळशीतील माले, मुठे भागांत बऱ्यापैकी हलका पाऊस पडला. पौड, घोटावडे, थेरगाव, पिरंगुट भागांत शिडकावा झाला.

भोरमधील भोलावडे, नसरापूर, किकवी, वेळू, आंबवडे, संगमनेर, निगुडघर, मावळमधील तळेगाव, काले, खडकाळा, लोणावळा, शिवणे, वेल्ह्यातील पानशेत, विंझर, आंबवणे, जुन्नरमधील नारायणगाव, वडगाव आनंद, निमगाव सावा, बेल्हा, राजूर, डिंगोरे, आपटाळे, ओतूर, खेडमधील वाडा, राजगुरुनगर, कुडे, पाईट, चाकण, आळंदी, पिंपळगाव, कन्हेरसर, कडुस, आंबेगावमधील घोडेगाव, आंबेगाव, कळंब, पारगाव, मंचर या भागांत हलक्या सरी आल्या.

हंगाम गेला अन् पाऊस आला

यंदा अनेक शेतकऱ्यांनी चांगला पाऊस होईल, या अपेक्षेने खरिपाचे मे महिन्यापासून नियोजन केले होते. आता पावसाचे जवळपास साडेतीन महिने लोटले आहेत. या काळात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामात अनेक ठिकाणी पिके जळून गेली. काही ठिकाणी पिके सुकत असून, त्यांची वाढ खुंटली आहे.

त्यामुळे हंगाम वाया गेला आहे. उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाचे अखेरचे दहा ते बारा दिवस राहिले. परतीचा पुरेसा पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना रब्बीचे नियोजन करता येईल. त्यातच मागील दोन दिवसांपासून पावसास काही प्रमाणात पुन्हा सुरुवात झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Rate : डाळिंबाचे दर स्थिर

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेची वैधता काय?

Soybean Rate : सोयाबीनचा सरासरी दर चार हजारांच्या आत

Maharashtra Weather : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पाऊस शक्य

Retreating Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीला सुरुवात

SCROLL FOR NEXT