Khandesh Rain Update : खानदेशात हलका ते मध्यम पाऊस

Latest Rain Update : खानदेशात पोळा सणाला, म्हणजेच गुरुवारी (ता.१४) हलका ते मध्यम पाऊस अनेक भागांत झाला. परंतु कुठेही १० ते १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ पाऊस झाला नाही.
Khandesh Rain
Khandesh RainAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात पोळा सणाला, म्हणजेच गुरुवारी (ता.१४) हलका ते मध्यम पाऊस अनेक भागांत झाला. परंतु कुठेही १० ते १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ पाऊस झाला नाही. ऑगस्टमध्ये दुष्काळी स्थिती राहिल्याने पोळा सणही फारसा उत्साताह गावोगावी झाला नाही.

पीकस्थिती हवी तशी नाही. कारण पाऊसमान जून ऑगस्टमध्ये कमी राहिले आहे. पावसाचा मुख्य काळ ऑगस्ट महिन्याचा आहे.

या काळात मूग, उडीद, सोयाबीन, पूर्वहंगामी कापूस आदी पिकांना फुले, फळे तयार होतात, शेंगा लगडतात. परंतु याच काळात पाऊस नव्हता. ६ ते ८ सप्टेंबरदरम्यान पाऊस अनेक भागांत झाला.

यामुळे काळ्या कसदार जमिनीत पिकांना दिलासा मिळाला. परंतु मुरमाड, हलक्या जमिनीतील पिकांची ६० ते ७० टक्के हानी झाली आहे. यामुळे यंदाच्या पोळा सणासंबंधी फारसा उत्साह दिसला नाही.

Khandesh Rain
Pune Rain Update : पुणे विभागात सव्वातीन महिन्यांत ५८ टक्के पाऊस

पोळा सणाला पाऊस आला. कुठेही जोरदार पाऊस झाला नाही. जळगावमधील पारोळा, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, जळगाव, भुसावळ, चोपडा, यावल, रावेर, धुळ्यातील शिरपूर, धुळे, साक्री, नंदुरबारातील शहादा, तळोदा, नवापूर आदी भागतंत हलका ते मध्यम पाऊस झाला. काही भागांत तुरळक पाऊस गुरुवारी झाला. दुपारी १२ नंतर पावसाने हजेरी लावली. सायंकाळीदेखील तुरळक पाऊस जळगाव, एरंडोल आदी भागांत झाला.

शुक्रवारी (ता.१ ५) पहाटे काही भागांत हलका पाऊस झाला. सकाळीदेखील तुरळक पाऊस झाला. ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे शेतीकामांना ब्रेक लागला. खानदेशात सध्या शिरपूर, चोपडा, जळगाव, जामनेर या भागांत केळी लागवडीची लगबग सुरू आहे. परंतु पावसामुळे केळी लागवडीत अडथळा तयार होऊ शकतो.

Khandesh Rain
Rain Update : अमरावती जिल्ह्यातील २० महसूल मंडलांत ५० टक्‍केच पाऊस

या पावसाचा खानदेशात आता ज्वारी, मका, सोयाबीन, बाजरी, तूर या पिकांना लाभ होईल. ज्वारी व मका निसवले आहे. त्यांना पावसाची गरज आहे. सोयाबीनमध्ये शेंगा पक्व होत आहेत. तसेच तूर व बाजरीदेखील वाढीच्या अवस्थेत आहे. या पिकांना पावसाचा लाभ होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पाऊस ६७ टक्केच

खानदेशात ८ सप्टेंबरनंतर अपवाद वगळता कुठेही जोरदार पाऊस झालेला नाही. जळगाव जिल्ह्यातील एकूण पाऊसमान ७७५ मिलिमीटर आहे. या तुलनेत जिल्ह्यात ७५ टक्केच पाऊस झाला आहे. धुळ्यात ५७५ मिलिमीटर एकूण पाऊस पडतो.

धुळ्यातही एकूण सरासरीच्या ६५ टक्केच पाऊस झाला आहे. नंदुरबारातही एकूण सरासरीच्या ६४ टक्केच पाऊस झाला आहे. अर्थात खानदेशात एकूण सरासरीच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यातील पाऊसमान बरे आहे. एकूण पावसाची टक्केवारी ६७ टक्केच असल्याचे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com