Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain : पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी

गेल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर पावसाचा काहीसा जोर ओसरला आहे. अनेक ठिकाणी पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : गेल्या आठवड्यात दमदार पावसाने (Rainfall) हजेरी लावल्यानंतर पावसाचा काहीसा जोर (Rain Intensity) ओसरला आहे. अनेक ठिकाणी पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या असून, गुरुवारी (ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंत लोणावळा येथे ५१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

पावसाने उघडीप दिल्यामुळे जमिनीत वाफसा स्थिती आली आहे. त्यामुळे पिकांना चांगलाच दिलासा मिळाला असून, अतिपावसामुळे होणारे नुकसान टळण्यास मदत झाली आहे. मात्र, काही ठिकाणी नुकसान झाल्याने पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहे. पश्‍चिमेकडील तालुक्यात पावसाच्या सरी बरसत आहेत. मुळशीतील माले येथे ४२ मिलिमीटर, तर मुठे ४०, पिरंगुट १७, तर पौड, घोटावडे, थेरगाव भागांत हलका पाऊस पडला.

भोरमधील भोलावडे येथे २८, आंबवडे १०, संगमनेर १८, निगुडघर ३६ मिलिमीटर, तर नसरापूर, किकवी, वेळू भागात तुरळक सरी कोसळल्या. मावळमधील काळे १२, कार्ला ३७ मिलिमीटर, तर वडगाव मावळ, तळेगाव, खडकाळा, शिवणे भागात पावसाचा शिडकावा कायम होता. वेल्ह्यातील वेल्हा येथे ३८, पानशेत २९, विंझर ३२, आंबवणे २९ मिलिमीटर पाऊस पडला.

हवेलीतील पुणे वेधशाळा, केशवनगर, कोथरूड, खडकवासला, थेऊर, उरुळीकांचन, खेड, भोसरी, चिंचवड, कळस, हडपसर, वाघोली भागांत पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. जुन्नरमधील नारायणगाव, राजूर, डिंगोरे, आपटाळे या भागांत हलक्या सरी, तर वडगाव आनंद, निमगाव सावा, बेल्हा, ओतूर भागांत अंशतः ढगाळ हवामान होते. खेडमधील वाडा, राजगुरुनगर, कुडे, पाईट, चाकण, कडूस भागांत तुरळक सरी, तर आळंदी, पिंपळगाव, कन्हेरसर भागांत अधूनमधून ऊन पडत होते. आंबेगावमधील घोडेगाव, आंबेगाव, कळंब, पारगाव, मंचर भागांत हलक्या सरी पडल्या.

शिरूरमधील पाबळ वगळता उर्वरित टाकळी, वडगाव, न्हावरा, मलठण, तळेगाव, रांजणगाव, कोरेगाव, शिरूर भागांत ढगाळ वातावरण होते. बारामतीतील बारामती, माळेगाव, पणदरे या भागांत तुरळक सरी बरसल्या असून वडगाव, लोणी, सुपा, मोरगाव, उंडवडी भागांत पाऊस पडला नाही. इंदापूर, दौंड तालुक्यांतही ढगाळ वातावरण होते. पुरंदर तालुक्यातील भिवंडी येथे १८ मिलिमीटर, तर सासवड, परिंचे भागात हलक्या सरी पडल्या. तर कुंभारवळण, जेजुरी, राजेवाडी, वाल्हा भागांत ढगाळ हवामान होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT