Kharif Sowing: सरासरी पाऊस खरिपासाठी लाभदायक

भात (Paddy), सोयाबीन (Soybean), तृणधान्य (cereals) आणि कडधान्य (Pulses) यासारख्या खरीप किंवा उन्हाळी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी जून आणि जुलै हे दोन महिने निर्णायक असतात.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

पोषक वातावरण नसल्यामुळे जून महिन्यात पावसाने ओढ दिली. त्यामुळे खरीपातील पेरण्या (Kharif Sowing) रेंगाळल्या. त्यानंतरच्या काळात सर्वत्र जोरदार पाऊस झाला आणि खरीपातील पेरण्यांनी वेग घेतला. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) मते ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला असून हा पाऊस खरिपासाठी लाभदायक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

भारताच्या कृषी क्षेत्राचे भवितव्य अर्थकारणावर अवलंबून नसून नैऋत्य मोसमी वाऱ्यासोबत येणाऱ्या मॉन्सूनवर अवलंबून आहे. जुलैमध्ये झालेल्या सरासरीपेक्षा अधिकच्या पावसामुळे बऱ्याच काळानंतर एकत्रित पाण्याची पातळी सरासरीपेक्षा ८ टक्क्यांनी वाढली. संपूर्ण देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही, देशाच्या पूर्व आणि ईशान्येकडील भागांत पुरेसा पाऊस झालेला नाही. परिणामी, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये भात लागवडीत घट झाली.

भात (Paddy), सोयाबीन (Soybean), तृणधान्य (cereals) आणि कडधान्य (Pulses) यासारख्या खरीप किंवा उन्हाळी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी जून आणि जुलै हे दोन महिने निर्णायक असतात. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरच्या उत्तरार्धातही सरासरी पावसाचा अंदाज व्यक्त केला. या काळात सरासरीच्या ९४ ते १०४ टक्क्यांदरम्यान पाऊस पडेल, असा हवामानशास्त्र विभागाचा कयास असून पावसाचे हे प्रमाण भात लागवडीसाठी पोषक ठरेल.

२०२२-२०२३ (जुलै ते जुन) च्या खरीपातील धान्य उत्पादनाचे १६३. १५ दशलक्ष टनांचे उद्दिष्ट गाठता येणार आहे. २०२०-२०२१ मधील धान्य उत्पादनाच्या तिसऱ्या अंदाजापेक्षा (१५४.९३ दशलक्ष टन) हे प्रमाण ५ टक्क्यांनी अधिक असणार आहे. जुलै अखेरीस देशभरात ८२.३४ दशलक्ष हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. गेल्यावर्षी याच कालावधीत त्यापेक्षा २ टक्के कमी क्षेत्रात खरीपाच्या पेरण्या झाल्या होत्या.

कृषीमालाच्या किमतीनुसार शेतकऱ्यांकडून पिकांच्या लागवडीस प्राधान्य दिले जात असल्याचे संकेत आहेत. हमीभावापेक्षा (MSP) कमी दर मिळणाऱ्या कडधान्य लागवडीऐवजी शेतकरी हमीभावापेक्षा जास्त दर मिळणाऱ्या सोयाबीन (Soybean) आणि कापसासारख्या (Cotton) नगदी पिकांकडे वळले आहेत.

याखेरीज पेरण्यांचा पॅटर्नही गेल्या वर्षीपेक्षा फार बदललेला नाही. शेतकऱ्यांनी तुरीपेक्षा मुग, उडीद आणि इतर कडधान्याला पसंती दिलीय. ऑगस्टच्या मध्यापर्यंत पेरण्या सुरु राहतील. समाधानकारक पावसामुळे केवळ खरीपातील उत्पादनच वाढणार नसून रब्बी अथवा हिवाळी हंगामासाठी पोषक आर्द्रता निर्माण होणार आहे. देशभरातील प्रमुख १४९ जलाशयांतील जुलै अखेरीस मागाच्यावर्षीपेक्षा १९ टक्के अधिकचा पाणीसाठा उपलब्ध आहे.

हे प्रमाण मागच्या दहा वर्षांच्या सरासरीच्या ३९ टक्के भरते.मॉन्सूनच्या असंतुलित वाटचालीमुळे, पूर्व भागातील जलाशयांमधील साठा मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे आणि गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत हा साठा सर्वात कमी भरतो. केंद्रीय जल आयोगाच्या माहितीनुसार (Central Water Commission) दक्षिण, पश्चिम आणि मध्य प्रांतातील जलसाठा गेल्या वर्षीच्या आणि दशकातील पातळीपेक्षा चांगला ठरला आहे.

खरीपातील उत्पादनात वाढ झाली तरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. त्यामुळे फास्ट मूव्हींग कन्झ्युमर गुड्स (FMCG) आणि ट्रॅक्टर्स आदींची विक्री वाढते. त्याचा एकूणच आर्थिक विकासावरही सकारात्मक परिणाम होतो. रब्बी हंगामातील वाढत्या उत्पादनामुळे २०२२-२०२३ (जुलै-जून) मध्ये कृषी क्षेत्रातील विकास एकूण अर्थकारणाच्या विकासाला चालना देऊ शकेल.

मात्र आजवरील अनुभव लक्षात घेता असे होईलच, असे सांगता येत नाही. उत्पादनवाढीमुळे अन्नधान्याच्या किमती घसरल्या आणि पर्यायाने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. त्यामुळेच सरकारने २०२२-२०२३ च्या रब्बी आणि खरीप विपणन हंगामासाठी हमीभाव (MSP) जाहीर करून शेतकऱ्यांची चिंता दूर करण्याचा प्रयत्न केलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com