Kharif Sowing : भात लागवड क्षेत्रात १३ टक्क्यांची घट

भातपिकाखेरीज या खरीपात मका (Maize), भुईमूग (Ground nut), कुळीथ आणि तुरीचा पेराही घटला आहे. विशेष म्हणजे सरकारने गेले दोन आठवडे भात (Paddy), कापूस (Cotton) आणि ऊस (Sugarcane) लागवडीचे आकडे जाहीर केलेले नाहीत.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

या वर्षीच्या खरिपात भात (Paddy Cultivation) लागवगडीखालील क्षेत्रात १३ टक्क्यांची घट झाली आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत २६७.०६ लाख हेक्टर क्षेत्रात भातलागवड करण्यात आली होती. या तुलनेत यंदाच्या खरिपात २३१.५९ लाख हेक्टर क्षेत्रात भात लागवड करण्यात आली.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने खरीप लागवडीसंदर्भातील २९ जुलैपर्यंतची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार या खरीपातील एकूण लागवड क्षेत्रातही मागच्या वर्षीच्या तुलनेत २.२ टक्क्यांची घट झाली. वृत्तसंस्थेने दिलेलया माहितीनुसार, २९ जुलैपर्यंत देशभरात ८२३.४० लाख हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची लागवड झाली. गेल्यावर्षी याच कालावधीत ८४१.६६ लाख हेक्टर क्षेत्रात खरीपाची लागवड झाली होती.

Kharif Sowing
sugar exports: केंद्राकडून लवकरच अतिरिक्त साखर निर्यातीला मंजुरी?

भातपिकाखेरीज या खरीपात मका (Maize), भुईमूग (Ground nut), कुळीथ आणि तुरीचा पेराही घटला आहे. विशेष म्हणजे सरकारने गेले दोन आठवडे भात (Paddy), कापूस (Cotton) आणि ऊस (Sugarcane) लागवडीचे आकडे जाहीर केलेले नाहीत.

मागच्या आठवड्यात ५९ लाख हेक्टर क्षेत्रात भात लागवड करण्यात आली. त्यातुलनेत मागच्या काळात ६० लाख हेक्टर क्षेत्रात भात लागवड करण्यात आली होती. याचा अर्थ भात लागवडीचा वेग वाढत आहे. हा वेग असाच कायम राहिल्यास लागवडीखालील क्षेत्रातील मागची तफावत भरून निघाली असती. मात्र उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नसल्याने ते शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले.

Kharif Sowing
wheat silos: चार राज्यांत गहू साठवणुकीसाठी सायलोची उभारणी

मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडूतील भात लागवडीखालील क्षेत्र वाढलं आहे, मात्र तांदूळ उत्पादक (Rice Producer) राज्य म्हणून ओळखलया जाणाऱ्या पश्चिम बंगाल,तेलंगणा, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, ओडिशा, हरियाणा, आसाम या राज्यांतील भात लागवडीच्या क्षेत्रात घट झाली.

यंदा खरिपात सर्व प्रकारच्या कडधान्य (Pulses Cultivation) लागवडीखालील क्षेत्रात ३ टक्क्यांची वाढ झाली. मागच्या वर्षीच्या कडधान्य लागवडीखालील क्षेत्राच्या (१०३.२३ लाख हेक्टर) तुलनेत या खरिपात १०६.१८ लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्यांची लागवड करण्यात आली.

महाराष्ट्र (Maharashtra) आणि तेलंगणा (Telangana) या दोन तूर उत्पादक राज्यातील शेतकरी कापूस लागवडीकडे वळल्याने तूर लागवडीखालील क्षेत्रात १३.५ टक्क्यांची (३६.११ लाख हेक्टर) घट झाली. या खरिपात मुगाचा पेरा १५.७ टक्क्यांनी वाढला असून त्यामागे दरवाढ आणि राजस्थानात वेळेवर झालेला पाऊस कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते.

Kharif Sowing
Compensation : झारखंडमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत

सोयाबीनचा पेरा वाढला

या खरिपात १६४.३४ लाख हेक्टर क्षेत्रात तेलबियांची (Oil seeds) लागवड झाली. मागच्या वर्षी याच कालावधीत १६३.०३ लाख हेक्टर क्षेत्रात तेलबिया लागवड करण्यात आली होती. तेलबियामध्ये सोयाबीनचा (Soybean) पेरा २.५ टक्क्याने (१४२२१ लाख हेक्टर) वाढला असून भुईमुग (Ground nut) लागवड क्षेत्र २.५ टक्क्याने (३७.४१ लाख हेक्टर) घटले. सुरुवातीला राजस्थानात भुईमूग लागवड क्षेत्रात वाढ झाली असल्याचे आकडे होते, मात्र इतर राज्यांतील भुईमूग लागवडीत घट झाली.

या खरिपात देशभरातील तृणधान्य (Cereals) लागवडीत ५.१ टक्क्यांची वाढ झाली. मागील वर्षातल्या १३५.३० लाख हेक्टरवरून तृणधान्य लागवडीचे क्षेत्र या खरिपात १४२.२१ लाख हेक्टरवर गेले. मका लागवड क्षेत्र ५ टक्क्यांनी (६९.०५ लाख हेक्टर) घटले.

Kharif Sowing
Cow Urine: छत्तीसगड सरकार करणार गोमूत्राचीही खरेदी

मागच्या वर्षी शेतकऱ्यांच्या कापसाला (Cotton) चांगला दर मिळाला होता, त्यामुळे या खरिपातही शेतकऱ्यांनी कपाशीला प्राधान्य दिल्याचे दिसते. मागच्या वर्षी १११.६९ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची (Cotton Cultivation) लागवड करण्यात आली होती. या खरिपात त्यात ५.३ टक्क्यांनी वाढ झाली असून ११७.६५ लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली.

ज्यूट लागवडीखालील क्षेत्र मागच्या वर्षीच्या ६.९४ लाख हेक्टरच्या तुलनेत ६.९१ लाख हेक्टरवर आले. ऊस लागवड (sugarcane) क्षेत्रात गेल्या वर्षीच्या (५४.४२ लाख हेक्टर) तुलनेत या खरिपात किंचित (५४.५१ लाख हेक्टर) वाढ झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com