Farm Agrowon
ताज्या बातम्या

Jalna Rain : पावसाची उघडीप यंदा चिंता वाढविणार

Jalna Rain Update : प्रदीर्घ विश्रांतीनंतर मध्यंतरी रिमझिम व मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर मात्र पुन्हा पावसाने उघाडी दिली आहे. यंदा पावसाने दिलेली उघडीप घनसावंगी तालुक्यासाठी चिंता वाढविणारी ठरत आहे.

Team Agrowon

Jalna Weather Update : प्रदीर्घ विश्रांतीनंतर मध्यंतरी रिमझिम व मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर मात्र पुन्हा पावसाने उघाडी दिली आहे. यंदा पावसाने दिलेली उघडीप घनसावंगी तालुक्यासाठी चिंता वाढविणारी ठरत आहे.

ठिकठिकाणचे जलस्रोत कोरडे आहेत. त्यातच मका, सोयाबीन, कपाशी आदी पिके फुलोरा, दाणे भरण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने दडी मारल्याने यंदा उत्पादनावर परिणाम होणार आहे.

घनसावंगी तालुक्यात यंदा पावसाळ्यात जून महिना कोरडा , जुलैत कमी-अधिक प्रमाणात मध्यम व रिमझिम पाऊस झाला. याच पावसावर खरीप हंगामाची पेरणी केली. जुलैमधील पहिल्या पंधरवड्यातील रिमझिम पावसाने तालुक्यातील विविध खरीप पिकांनी उभारी घेतली होती. मात्र, ऑगस्ट महिन्यातील सात तारखेपासून पावसाने विश्रांती घेतली.

ऑगस्ट अर्थातच यंदाच्या श्रावण महिन्यात रिमझिम सरींचे दानदेखील तालुक्याच्या झोळीत पडले नाही. गेल्या महिन्यात पावसाने फिरवलेली पाठ, पहिल्या पंधरवड्यातील तीन ऑगस्टपासून ‘आश्‍लेषा तसेच दुसऱ्या पंधरवड्यातील १७ ऑगस्टपासून सुरू झालेल्या ‘मघा’ नक्षत्राने शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे.

तालुक्यातील खरीप हंगामातील सर्वच भागात पिके कमी-अधिक उंचीवर आहेत. अनेक भागात पिकांची वाढही खुंटलेली आहे. मध्यंतरी तीन ते चार दिवसांपूर्वी तालुक्यात पावसाने जोर धरला होता रिमझिम व भीज पावसाने तालुक्यात सर्वत्र गारवा निर्माण केला होता. या पावसामुळे पिकांना नवजीवन प्राप्त होईल व पाऊस आता स्थिरावेल अशी शक्यता होती. परंतु पावसाने पुन्हा दगा दिला.

घनसावंगी तालुक्यात ५४ टक्के पाऊस

घनसावंगी तालुक्‍यात अजूनही पावसाने पाठ फिरविलेली आहे. दरम्यान, तालुक्याची पावसाची सरासरी ६३८.४० मिलिमीटर असून मंगळवारपर्यंत (ता.१२) सरासरी ५४९.३६ मिलिमीटर पावसाची आवश्‍यकता होती, परंतु ता.एक जूनपासून आतापर्यंत ३४९.८० मिलिमीटर पाऊस झाला. मागील वर्षी या काळात ५८८ मिलिमीटर पाऊस झाला होता, तेव्हा टक्केवारी ९२.११ इतकी होती. यंदा ५४.७९ टक्के पाऊस झाला आहे. आगामी काळात जोरदार पावसाची आवश्यकता आहे.

कालवा क्षेत्रात काहीसा दिलासा

कुंभारपिंपळगाव, तीर्थपुरी डावा कालवा लाभक्षेत्रात सध्या सुरू असलेल्या जायकवाडीच्या कालव्याच्या पाण्यामुळे व वितरिकांवरील खरीप पिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.

कोरडवाहू शेतीचे बेहाल

दिवसेंदिवस उन्हांची वाढती तीव्रता पाहता कुठलाच जलस्रोत नसलेल्या व केवळ पावसावर अवलंबून असलेल्या अनेक गावांतील कोरडवाहू शेतीचे मात्र यंदा बेहाल झाले आहेत. पावसाने मारलेल्या दडीचा मोठा फटका बसू लागला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed Germination Issue: सोयाबीन बियाण्यांची ३० टक्केच उगवण

Pune Rainfall: ताम्हिणी घाटात १९० मिलिमीटर पाऊस

Collector Jitendra Dudi: नागरिकांचे मूलभूत प्रश्‍न सोडवा

Maharashtra Heavy Rain: कोकण, घाटमाथ्यावर पुन्हा मुसळधार

Varun Seed Scam: वरुण सीड्स कंपनी काळ्या यादीत

SCROLL FOR NEXT