
Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यातील पावसाचा खंड काळ वाढत चालला आहे. तापमानात वाढ झाली आहे. या दोन जिल्ह्यातील सर्वच भागातील हलक्या, मुरमाड डोंगराळ भागातील दगडगोट्याच्या तसेच मध्यम प्रकारच्या जमिनीवरील पिके कडक उन्हामुळे करपून गेली आहेत.
पानगळ झाल्यामुळे शिवारात पाला पाचोळा उडत असल्याचे चित्र अनेक भागात दिसत आहे.परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांमध्ये ३५ हून अधिक दिवस पावसाचा खंड आहे. जिंतूर, गंगाखेड, पालम तालुक्यातील डोंगराळ माळारानावरील दगडगोट्याच्या जमिनी तसेच परभणी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा तालुक्यातील हलक्या, बरड, मुरमाड, मध्यम जमिनीतील ओलावा पूर्णपणे उडला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांमध्ये ३२ हून अधिक दिवस पावसाचा खंड आहे. सेनगाव, औंढा नागनाथ, हिंगोली, कळमनुरी, वसमत तालुक्यांतील डोंगराळ भागातील हलक्या, मध्यम,जमिनीत अजिबात ओलावा राहिला नाही. भेगा पडल्या आहेत.
पावसाने दडी मारल्याममुळे या दोन जिल्ह्यातील सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कपाशी, तूर आदी पिकांनी उन्ह धरले आहे.
सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी पिके वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. परंतु वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे अडचणी येत आहेत. विहिरी, बोअर, तलाव, प्रकल्पांतील पाणीपातळी खालावली आहे. चारा, पाणी टंचाईची चाहूल लागली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.