Shalinitai Patil Passes Away: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे शनिवारी (दि. २० डिसेंबर) निधन झाले. त्यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. मुंबईतील माहिम येथील राहत्या घरी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सातारा येथील कोरेगाव तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत..मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी पहिल्यांदा आवाज उठवला होता. वसंतदादा पाटील यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या. लढाऊ बाणा आणि स्पष्टवक्त्या राजकारणी म्हणून त्या ओळखल्या जात. एआर अंतुले यांच्या सरकारमध्ये त्यांनी महसूलमंत्रीपद भूषविले होते. महसूलमंत्री असताना त्यांनी सामान्य शेतकरी, कष्टकरी आणि दुर्बल घटकांसाठी नेहमीच न्यायाची भूमिका घेतली. कोरेगाव मतदारसंघातून त्या दोनवेळा निवडून आल्या होत्या..Baba Adhav Passes Away: सत्यशोधकांचा वारसा.त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. ''राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या पत्नी तथा माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांच्या निधनानं एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,'' असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. स्व. वसंतदादा पाटील यांना आयुष्यभर खंबीर साथ देत शालिनीताईंनी सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात मोलाचं योगदान दिलं. पाटील कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. .Reservation Issue: मराठा जातीचा ओबीसी संवर्गामध्ये समावेश नको.''माजी मंत्री शालिनीताई पाटील यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. मा. मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या धर्मपत्नी असल्या तरी राजकारणात मात्र त्यांनी स्वतःचं स्वतंत्र असं स्थान निर्माण केलं होतं. लढाऊ बाणा आणि स्पष्टवक्त्या राजकारणी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील एक युग काळाच्या पडद्याआड गेले. या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना आणि वसंतदादांच्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मिळो, ही सदिच्छा!,'' अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी शालिनीताई पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.