Farming Agrowon
ताज्या बातम्या

Solapur Sowing : बार्शी, करमाळा पेरणीविना; पंढरपूर, मोहोळ, माढ्यामध्ये केवळ 2 टक्के क्षेत्रावरच पेरणी

Kharif in Solapur District Sowing : खरीप हंगामाची तयारी करून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यातही अपेक्षाभंगाला सामारे जावे लागले. केवळ २ टक्के क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत. दमदार पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामाचे दोन लाख ८९ हजार ५७० हेक्टर क्षेत्र आहे. १५ जून ते १० जुलै या काळात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने केवळ पाच हजार हेक्टरवरच (दोन टक्के) पेरणी होऊ शकली आहे. बार्शी व करमाळा तालुक्यात अजून पेरणीला सुरवात झालेली नाही. माढा, मोहोळ, पंढरपूर व मंगळवेढ्यात एकूण क्षेत्राच्या पाच टक्केसुद्धा पेरणी झाली नसल्याची स्थिती आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस अशी पिके घेतली जातात. ज्वारी, उडीद, सोयाबीन, कारळे, मूग या पिकांची अजून अपेक्षित पेरणी झालेली नाही. सध्या सोयाबीनची ३३४ हेक्टरवर, उडदाची १७०० हेक्टरवर व तुरीची ९३० हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणीला विलंब झाल्यास पुन्हा ऐन पावसात पिके अडकून नुकसान होऊ शकते, अशी चिंता आहे.

उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यात चार टक्के, अक्कलकोट तालुक्यात एक टक्के, मोहोळ तीन टक्के, माढ्यात एक टक्के, पंढरपूर तालुक्यात आठ टक्के, सांगोल्यात चार टक्के, माळशिरस तालुक्यात पाच टक्के व मंगळवेढ्यात एक टक्केच क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

सरासरीपेक्षा १३० मिलिमीटर कमी पाऊस

जिल्ह्यात १० जुलैपर्यंत सरासरी १९८ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. गतवर्षी १० जुलैपर्यंत २२४ मिलिमीटर पाऊस पडला होता. त्यामुळे गतवर्षी जिल्ह्यात जवळपास सव्वालाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा ११ जुलैपर्यंत अवघा ६८.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत पावणेतीन लाख हेक्टरपैकी केवळ पाच हजार १९३ हेक्टरवरच पेरणी झाली आहे.

पाऊस, पेरणीची सद्य:स्थिती

एकूण क्षेत्र २,८९,५७० हेक्टर

आतापर्यंत पेरणी ५,१९३ हेक्टर

सरासरी अपेक्षित पाऊस १९८.६ मिलिमीटर

आतापर्यंतचा सरासरी पाऊस ६८.४ मिलिमीटर

शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी जमिनीत अपेक्षित ओल असल्याची खात्री करावी. पेरणी करताना गडबड न करता पावसाची प्रतीक्षा केल्यास बियाण्यांची उगवण क्षमता निश्चितपणे वाढेल. आता पेरणी करायची झाल्यास अधिक बियाण्यांचा वापर करणे योग्य राहील.
दत्तात्रेय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT