Solapur Rain Update : सोलापूर जिल्ह्यात मोठ्या पावसाची हुलकावणी

Solapur Rain News: यंदाच्या पावसाळ्यात मृग नक्षत्र पूर्णतः कोरडे गेले. यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्या पावसाने आर्द्रा नक्षत्रात हजेरी लावली.
Solapur Rain Update
Solapur Rain UpdateAgrowon

Kharif Sowing : यंदाच्या पावसाळ्यात मृग नक्षत्र पूर्णतः कोरडे गेले. यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्या पावसाने आर्द्रा नक्षत्रात हजेरी लावली. शुक्रवारपासून (ता.२३) सोलापूर शहर व परिसराच्या वातावरणात बदल झालेला जाणवत आहे.

Solapur Rain Update
Rain Update : आठवड्याच्या सुरुवातीस चांगल्या पावसाची शक्यता

किरकोळ स्वरूपात पाऊस हजेरी लावत आहे. ढगाळ वातावरण आणि किरकोळ पाऊस असेच वातावरण आता राहू लागल्याने मोठ्या पावसाची हुलकावणी मिळत आहे. दरम्यान, दमदार पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. बळिराजा अद्याप दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

मृग नक्षत्रात पावसाने दडी मारल्याने खरिपातील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस न झाल्याने मूग व उडदाच्या पेरण्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पेरण्यांसाठी आवश्‍यक असलेली तयारी पूर्ण झालेली आहे.

Solapur Rain Update
Akola Rain News : जून कोरडा गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंता कायम

पेरणी योग्य पाऊस त्यानंतर वाफसा झाल्यानंतर पेरण्यांना खऱ्या अर्थाने वेग येणार आहे. पावसाने हजेरी लावल्यानंतर तापमानाचा पारा घटला आहे. २२ जूनपर्यंत सोलापूरच्या तापमानाचा पारा ३६ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहात होता. आता सोलापूरच्या तापमानाचा पारा ३३ अंश सेल्सिअसच्या घरात आला आहे.

ढगाळ वातावरण व रिमझिम पावसामुळे वातावरणातील उकाडा व उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. खरिपाच्या पेरण्यांसाठी अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यावर्षी पावसामुळे खरिपाच्या पेरण्या उशिरा होण्याची शक्यता असल्याने यंदाच्या खरिपात सोयाबिन, तूर या पिकांचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com