Jalgaon Brinjal Agrowon
ताज्या बातम्या

Jalgaon Brinjal : भरीत वांग्यांची लग्नसमारंभ, पार्ट्या, बाजारात रेलचेल

२० ते २५ रुपये दर; शेतकऱ्यांना अधिक दराची अपेक्षा

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः राज्यात प्रसिद्ध असलेली जळगावची भरीताची वांगी (Jalgaon Brinjal) यंदा बाजारात मुबलक आहेत. शेतकऱ्यांना बाजारात २० ते २५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. भरीत पार्ट्याही खानदेशात सुरू झाल्या आहेत. लग्नसमारंभ, वाढदिवस व इतर कार्यात भरीताचा मेनू दिसू लागला आहे. भरीत सेंटर किंवा भरीत विक्री केंद्रही जळगाव शहरात ५० पेक्षा अधिक जोरात सुरू आहेत. शेतकऱ्यांना मात्र अपेक्षेपेक्षा दर कमी मिळत आहेत.

भरीताच्या वांग्यांच्या उत्पादनासाठी जळगाव जिल्ह्यात यावलमधील न्हावी, भालोद, बामणोद, पाडळसे, हिंगोणे, अट्रावल, सातोद, वड्री, रावेरातील मस्कावद, वाघोदा, भुसावळातील तळवेल, वरणगाव, पिंप्री, जळगावमधील नशिराबाद, जळगाव खुर्द, आसोदा, तुरखेडा, आवार आदी भाग प्रसिद्ध आहे. या भागात लागवड यंदा काहीशी वाढली. जामनेर, एरंडोल, धरणगाव या भागांतही भरीत वांग्यांची लागवड अनेक शेतकरी करू लागले आहेत.

यंदा क्षेत्र सुमारे १०० ते ११० हेक्टरवर पोचल्याचा अंदाज आहे. तसेच वांगी पिकासाठी अनुकूल आर्द्रतायुक्त व अंशतः ढगाळ वातावरणदेखील ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये होते. यामुळे वांग्यांचे पीक जोमात होते. त्याचे चांगले उत्पादनही हाती आले आहे. काढणीला अलीकडेच किंवा मागील १२ ते १५ दिवसांत वेग आला आहे.

मागील वर्षी शेतकऱ्यांना बाजार समितीत सुरवातीला किंवा ऑक्टोबरमध्ये ३० ते ३५, नोव्हेंबरमध्ये ३० आणि थंडी वाढल्यानंतर म्हणजेच डिसेंबरमध्ये ३५ ते ४० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला होता. यंदा मात्र सुरवातीपासून २० ते २५ रुपये प्रतिकिलोचा दर आहे. ग्राहकांना ४० ते ५०, ५५ रुपये प्रतिकिलो या दरात भरीताची वांगी जळगाव, भुसावळ, रावेर, यावल, जामनेर, धरणगाव आदी शहरांत मिळत आहेत.


बामणोदच्या वांग्यांना चांगले दर
बामणोद येथील वांग्यांना मात्र चांगले दर आहेत. काहीसे लांबट, हिरवे, चमकदार, खाण्यास रुचकर, नैसर्गिक तेलयुक्त आणि वजनाला अधिक (अर्धा ते एक किलो) अशी या भागांतील वांग्याला ओळख आहे. यामुळे अनेक पार्ट्या, मेजवानीत बामणोदच्या वांग्यांना मागणी असते. तेथील शेतकऱ्यांनाही किमान ४० ते ५० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. तेथील शेतकरी थेट विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raju Shetti: १२९ कारखान्यांकडे २ हजार कोटींची एफआरपी थकित, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे तक्रार

Soybean Farmers Protest: सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी, 'स्वाभिमानी'चे गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन

Special Agriculture Zone: कर्नाटकात शेती व्यतिरिक्त जमिनीच्या खरेदी-विक्री ला बंदी ; १ हजार ७७७ एकरवर विशेष कृषी क्षेत्राची निर्मिती  

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना महिन्याला २,१०० रुपये देऊ; एकनाथ शिंदेंची ग्वाही

Sugarcane Payment: मांजरा कारखान्याकडून २७५० रुपयांचा हप्ता जमा

SCROLL FOR NEXT